बंगालचा गोलंदाज इशान पोरेलने त्याच्या कामगिरीने नुकत्याच पार पडलेल्या रणजी ट्रॉफी मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने बंगालला २०१९-२० रणजी मोसमाच्या अंतिम सामन्यात पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
त्याने या मोसमात ६ सामने खेळले. कारण त्याआधी तो भारत अ संघाकडून खेळत होता. पण त्याने बंगालकडून या मोसमात खेळलेल्या ६ सामन्यात २३ विकेट्स घेतल्या आहेत. पोरेल २०१८ ला १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता.
पण या विश्वचषकानंतर सातत्याने झालेल्या दुखापतींमुळे त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागत होते. परंतू आता तो चांगली कामगिरी करत आहे. या प्रवासाबद्दल त्याने इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. तसेच त्याने असेही म्हटले आहे की भारताचा कर्णधार विराट कोहलीला गोलंदाजी करायला आवडेल असेही म्हटले आहे.
तो म्हणाला, ‘खरोखर हा एक खडतर प्रवास होता. या छोट्या कालावधीत, मला बर्याच दुखापती झाल्या आहेत. माझ्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मी पाच किंवा सहा महिन्यांसाठी बाहेर पडलो. माझ्या डाव्या बरगडीच्या वरच्या बाजूला मला स्ट्रेस फ्रॅक्चर देखील झाला होते.’
‘१९ वर्षांखालील विश्वचषकादरम्यान माझ्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे दुखापती माझ्यासाठी एक मोठे आव्हान आहे, पण यामुळे मला एक चांगला गोलंदाज होण्यास मदत झाली आहे. याशिवाय, माझे पालक, प्रशिक्षक आणि मित्र नेहमी मला पाठिंबा देण्यासाठी असतात.’
इशान पोरेलने बंगालकडून रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात कर्नाटकविरुद्ध ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्याबद्दल बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी त्याचे कौतुक केले होते. तसेच त्यांनी म्हटले होते की तो विराटलाही बाद करु शकतो.
याबद्दल पोरेल म्हणाला, ‘मी दुसऱ्या दिवशी अरुण सर जे म्हणाले, त्याबद्दल वृत्तपत्रात वाचले होते आणि मला कोणीतरी त्याबद्दल मेसेजही पाठवला होता. नक्कीच मला विराट कोहलीला गोलंदाजी करायला आवडेल. तो आमच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे. माझ्यासाठी एक युवा खेळाडू म्हणून हा स्वप्नवत क्षण असेल.’
रणजी उपांत्य सामन्यात पोरेलने केएल राहुलला दुसऱ्या डावात शुन्यावर बाद केले होते. तसेच या स्पर्धेदरम्यान हनुमा विहारीलाही त्याने बाद केले होते. याबद्दल बोलताना तो म्हणाला, मैदानात असताना अन्य कोणत्याही फलंदाजाला गोलंदाजी करताना जशी भावना असते तशीच भावना माझी त्यांना गोलंदाजी करतानाही होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-माझ्याबद्दल माहिती हवी आहे, लायब्ररीत जाऊन वाच
–तुझ्यासारख्या लोकांसाठी ट्विटर बनवलं नाही, ट्विटरऐवजी दुसरं काहीतरी बघ
–जगातील श्रीमंत क्रिकेट लीगमधून डेविड वाॅर्नर बाहेर