भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज-यष्टीरक्षक रिषभ पंतची फलंदाजी मागील काही काळापासून चर्चेचा विषय बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गाबा कसोटीमध्ये ज्याप्रकारे स्फोटक फलंदाजी केली ती चाहत्यांच्या कायम लक्षात राहिली आहे. तसेच त्याने इंग्लंडच्या दौऱ्यातही जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. या दौऱ्यातील एजबस्टन कसोटीत त्याने पहिल्या डावात १४६ आणि दुसऱ्या डावात ५७ धावांची खेळी केली. त्याच्या या फलंदाजीने गोलंदाज धास्तावलेले असताना ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने मात्र पंतला गोलंदाजी करण्याची इच्छा दर्शवली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) याची क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये गणती केली जाते. त्याच्या गोलंदाजीचा वेग जबरदस्त आहे. त्याने आपल्या अतिवेगवान गतीने अनेक फलंदाजांना त्रास दिला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक महान फलंदाजांना गोलंदाजी केली आहे. त्यामध्ये सचिन तेंडूलकर, ब्रायन लारा, कुमार संगकारा, जॅक कॅलिस इत्यादींचा समावेश आहे. आता त्याने रिषभ पंत (Rishabh Pant) याला गोलंदाजी करण्याची इच्छा दर्शवली आहे.
नुकतेच ब्रेट लीला विचारले गेले की, त्यांना संधी मिळाली तर सध्याच्या भारतीय संघातील कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करायला आवडेल? यावर उत्तर देताना तो म्हणाला, “पंत हा एक उत्तम फलंदाज आहे आणि मी त्याच्या विरोधात गोलंदाजी करू इच्छितो.” एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलताना ब्रेट लीने म्हटले, “पंत एक वेगळाच फलंदाज आहे. त्याची शॉट्सही चांगले असल्याने त्याला गोलंदाजी करणे खूपच रोमांचक ठरेल.”
(Brett Lee On Rishabh Pant)
Rishabh Pant Is Probably One Guy I Would Like To Bowl To And Challenge Myself – Brett Lee pic.twitter.com/W6FyH2wSDf
— Duck (@DuckInCricket) August 23, 2022
ब्रेट ली हा लवकरच लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. ही लीग सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खेळली जाणार आहे. याचे सामने भारतात कोलकाता, जोधपूर, कटक, लखनऊ, दिल्ली येथे खेळले जाणार आहेत. तर दुसरीकडे पंत २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. यामध्ये भारत पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध दुबई येथे खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शाहिद आफ्रिदीकडून ही अपेक्षा नव्हती! भारत-पाकिस्तान सामन्याबाबत बरळला असे काहीतरी
बाबर इथं शतक हाणून बसलाय अन् विराटला साधा सिक्स मारायला जमंना!
‘त्याला कोरोना झालाच नाही, हे तर फक्त…’; शास्त्री गुरूजींचे अजब विधान