भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला बुधवारी(२३ डिसेंबर) १६ वर्षे पूर्ण झाली. धोनीने २३ डिसेंबर २००४ ला बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले. कर्णधार म्हणूनही त्याने मोठे यश मिळवले. पण त्याला जेव्हा कर्णधार करण्यात आले तेव्हा ते अनेकांसाठी अनपेक्षित होते, असा खुलासा भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने केला आहे.
विशेष म्हणजे धोनीच्या पदार्पणाच्या वनडे सामन्यात कैफ सामनावीर ठरला होता. त्याने बांगलादेशविरुद्ध १११ चेंडूत ८० धावांची खेळी केली होती.
कैफने युवा धोनीला पहिल्यांदा पाहिल्यानंतर काय वाटले, याबद्दल स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात सांगितले होते. तो म्हणाला, मी जेव्हा दुलीप ट्रॉफीमध्ये सेंट्रल झोनचे नेतृत्व करत होतो, तेव्हा धोनीला पहिल्यांदा पाहिले होते. तो इस्ट झोनकडून यष्टीरक्षक म्हणून खेळत होता. तो सुद्धा भारत अ संघाकडून दौऱ्यावर जाणार होता.’
पुढे कैफ म्हणाला, ‘लखनऊमधील माझ्या एका मित्राने मला सांगितले होते की एक खेळाडू आहे, त्याच्यावर लक्ष दे. त्याचे केस लांब आहेत आणि तो ज्या प्रकारे षटकार मारतो, तसे मारताना मी कोणाला पाहिले नाही. त्यावेळी खेळत असलेला मी, झहीर खान, हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग, आमच्यापैकी कुणीही विचार केला नव्हता की तो भारताचे नेतृत्व करेल. त्याने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले.’
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक, २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तसेच २००९ ला भारतीय संघ धोनीच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला होता.
धोनीने याचवर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३५० वनडे, ९० कसोटी आणि ९८ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने १७ हजारांहून अधिक धावा केल्या असून यात त्याच्या १६ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने यष्टीरक्षण करताना ८२९ विकेट्स यष्टीमागे घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तुझ्या पत्नीला माझ्या शुभेच्छा दे’, स्टीव स्मिथने विराटला पहिल्या कसोटीनंतर दिला संदेश
कोरोना व्हायरसमुळे इंग्लंडची चिंता पुन्हा वाढली; ‘या’ दौर्याबद्दल आली मोठी माहिती समोर
टॉप ३ : टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावांची खेळी करणारे यष्टिरक्षक
ट्रेंडिंग लेख –
टॉप ३ : टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावांची खेळी करणारे यष्टिरक्षक
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या ४ गोष्टी
सोळा वर्षे आणि सोळा गोष्टी! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास