झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या 2023 वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेतून शनिवारी (1 जूलै) सर्वात अनपेक्षित निकाल समोर आला. सुपर सिक्स फेरीच्या सामन्यात स्कॉटलंड संघाने वेस्ट इंडिजला 7 गडी राखून पराभूत केले. यासह वेस्ट इंडीज 2023 वनडे विश्वचषकासाठी पात्र होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला. दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्टइंडीज संघावर प्रथमच ही नामुष्की आली. यानंतर त्यावेळी मैदानात हजर असलेले वेस्ट इंडिजचे अनेक माजी क्रिकेटपटू भावनिक झालेले दिसले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CuLygbqO2Rj/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत वेस्ट इंडीजला झिम्बाब्वे व नेदरलँड्सने पराभूत केलेले. तरीदेखील ते सुपर 6 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. सुपर सिक्स फेरीच्या सर्व सामन्यात विजय मिळवून झिम्बाब्वे व श्रीलंका यांच्या पराभवासाठी त्यांना प्रार्थना करायची होती. मात्र, त्यांनाच आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. या कारणाने ते आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक खेळू शकणार नाहीत.
एकेकाळी क्रिकेट जगतावर राज्य केलेल्या या संघाची ही स्थिती पाहून अनेकांनी दुःख व्यक्त केले. वेस्ट इंडीज संघाचा विद्यमान प्रशिक्षक डॅरेन सॅमी या पराभवानंतर पुरता हताश दिसला. तसेच या सामन्याचे समालोचन करत असलेले वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज क्रिकेटपटू इयान बिशप व कार्लोस ब्रेथवेट हे देखील आपले अश्रू लपवताना दिसले. तर, माजी कर्णधार कार्ल हूपर यांना अश्रू अनावर झाले. यावेळी ते डोळे पुसताना दिसले.
सोशल मीडियावर देखील अनेक माजी क्रिकेटपटूंनी वेस्ट इंडीज क्रिकेटची ही अवस्था पाहण्यासारखी नाही असे म्हटले. तसेच काहींनी ते पुन्हा पुनरागमन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
(Ian Bishops Sammy Hooper Cried After West Indies Loss In ODI World Cup Qualifier)
महत्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीवरही पाहुण्या ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड! अखेरच्या दिवशी विजय 6 बळी दूर
SAFF CUP: ब्लू ब्रिगेडची फायनलमध्ये एन्ट्री! पेनल्टी शूट आऊटमध्ये लेबनॉनवर केली मात