सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांबाबत जोरदार चर्चा होत आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने नुकतीच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टलाही केंद्रीय करारातून बाजूला केले गेले आहे. त्यामुळेच अनेकदा कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाबाबतही प्रश्नचिन्ह उभे केले जातात. आता याच मुद्द्यावर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व दिग्गज क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी महत्त्वाची टिप्पणी केली आहे.
टी२० क्रिकेटचा अतिरेक होत असताना कसोटी क्रिकेट संपेल का या प्रश्नावर उत्तर देताना चॅपेल म्हणाले,
“मला विचारलं तर कसोटी क्रिकेट कधीही संपणार नाही. फक्त इतके होऊ शकते की, तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडू पाहायला मिळणार नाहीत. सर्वोत्कृष्ट खेळाडू नसल्यास तुम्ही कसोटी क्रिकेट पाहणार नाही.”
सध्या ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू ख्रिस लिनने युएईतील इंटरनॅशनल लीग टी२० मध्ये खेळण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याला हे प्रमाणपत्र देण्याची शक्यता कमी आहे. कारण, याच कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगचे आयोजन केले जाते. याबाबत बोलताना चॅपेल म्हणाले,
“क्रिकेट ऑस्ट्रेलिया लिनला खेळण्यासाठी परवानगी देणार नाही अशी शक्यता आहे. त्याच्या जागी मी असतो तर, मी बोर्डाला कोर्टात खेचले असते.” क्रिकेटजगतात असेच सुरू राहिले तर पुन्हा एकदा कॅरी पॅकर यांच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटचे दिवस सुरू होतील, अशी देखील भीती व्यक्त करून दाखवली.
सध्या क्रिकेट जगतात प्रत्येक देशाची टी२० लीग सुरू आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत व युएईत नव्या लीग सुरू होणार आहेत. यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू सहभागी होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
BREAKING। भारताशी दोन हात करायला बांग्लादेशचा संघ जाहिर! अनपेक्षित खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा
टीम इंडियाला मिळाला नवा बॅटींग कोच! विश्वचषक मिळवून देणारा पठ्ठ्या देणार भारतीय फलंदाजांना प्रशिक्षण
‘आमच्या खेळाडूंना आयपीएलमुळेच बाकीच्या टी२० लीगमध्ये नो एंट्री’, पाकिस्तानच्या दिग्गजाचा आरोप