ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाच्या माजी यष्टीरक्षक फलंदाज इयान हिली यांनी भारतीय संघावर निशाणा साधला आहे. त्यांनी भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघ कोणताही सराव सामना न खेळण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याच्या खळबळजनक भाष्यानंतर इयान हिली (Ian Healy) यांनी हे वक्तव्य केले आहे. ख्वाजा म्हणाला होता की, भारत दौऱ्यावर सराव सामना खेळण्याचा काहीच फायदा नाही. कारण, जेव्हा मुख्य मालिका सुरू होईल, तेव्हा खेळपट्टी एकदम वेगळ्या असतील.
ख्वाजा याने या महिन्याच्या सुरुवातीला माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, “तुम्हीदेखील कधी आमच्यासोबत दौऱ्यापूर्वी गेला आहात? जेव्हा आम्ही खेळतो, तेव्हा फिरकीपटूंसाठी मदत मिळणाऱ्या खेळपट्टी असतात. मात्र, जेव्हा आम्ही सराव सामने खेळतो, तेव्हा तिथे गाबासारख्या हिरव्या खेळपट्ट्या असतात. त्यामुळे सराव सामने खेळण्यात अर्थ काय आहे?”
ऑस्ट्रेलियाच्या माजी यष्टीरक्षक फलंदाजाने ख्वाजाच्या या वक्तव्याचे समर्थन केले. त्यांनी एका रेडिओशी बोलताना सांगितले की, “आम्ही रणनीतीच चर्चेसाठी फिरकीपटूंना सिडनीमध्ये बोलावले आहे. आम्हाला ज्या सुविधा हव्या आहेत, त्या मिळतीलच याचा विश्वास नाहीये.”
त्यांनी असेही म्हटले की, “तसंही आम्हीही या फसवणुकीचे शिकार झालो आहोत. जेव्हा आम्ही इंग्लंडला जायचो, तेव्हा आमचा वेळ वीकेंड काऊंटी संघाबाबत बोलण्यामध्ये घालवायचो. मालिकेपूर्वी आमची चर्चा याविषयी व्हायची की, शेवटी इंग्लंड संघात कोणता खेळाडू सामील होईल.”
या मुद्द्यावर पुढे बोलताना ते म्हणाले की, “क्रिकेटमधील आमचे लक्ष आमच्या सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि येणाऱ्या संघासाठी संधी तसेच अनुभव तयार करण्यावरून हटले आहे. आता आम्हाला मोठ्या मालिकेसाठी दौऱ्यावर येणाऱ्या संघांना तयारीपासून वंचित ठेवायचे आहे. क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये अशाप्रकारच्या विश्वासाची कमतरता पाहणे खूप निराशादायी आहे. हे थांबले पाहिजे.”
हिली पुढे बोलताना म्हणाले की, “अलीकडे आम्ही पाहतो की, परदेशी दौरा करणारे संघ संघर्ष करतात. आम्ही पाहत आहोत की, आम्ही भारत दौरा करत आहोत आणि आम्हाला तिथे कोणताही सराव सामना खेळायचा नाहीये. यानंतर इंग्लंडचा विषयच सोडून द्या, तिथे आम्ही 2001नंतर कसोटी मालिका जिंकलो नाहीत.”
“भारताविषयी ऑस्ट्रेलिया संघ विचार करत आहे की, सर्व गोष्टी ठीक होतील. खेळाडूंना ताजेतवाने वाटेल आणि सराव सत्रातून फायदा होईल. आमच्या प्रशिक्षण विभागालाही असेच करायचे आहे आणि आम्ही यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीपूर्वी एक सराव सामना पाहायला आवडेल. मला तीन दिवसीय एक सामना पाहायचा आहे, जेणेकरून आमच्या सात राखीव खेळाडूंनाही खेळवता येईल.”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. आता 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल. (ian healy support cricketer usman khawaja statement for not playing practice match in india tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खेळपट्टी वादामध्ये सूर्याने मांडलं हार्दिकपेक्षा वेगळं मत; म्हणाला, ‘त्याने काही फरक नाही पडत…’
पंड्या अन् सँटनरची नजर मालिका खिशात घालण्यावर, जाणून घ्या तिसऱ्या टी20 सामन्याविषयी सर्वकाही