न्यूझीलंड क्रिकेट संघासमोर यावर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आव्हान असेल. मागील दोन विश्वचषकात न्यूझीलंड संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला होता. यावेळी अंतिम फेरीत पराभूत न होता विश्वचषक उंचावण्याचा त्यांचा मानस असेल. मात्र, संघाच्या या ध्येयाला हादरा बसला आहे. कारण, संघाचा कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीची जबाबदारी मार्टिन गप्टिल याच्याकडे देण्यात यावी अशी मागणी प्रसिद्ध समालोचक इयान स्मिथ यांनी केली आहे.
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने केन विलियम्सन आयपीएलसह पुढील सहा ते आठ महिन्यांसाठी क्रिकेटच्या मैदानाबाहेर झाला आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून, तो थेट पुढील वर्षीच मैदानावर दिसू शकतो. अशा स्थितीत न्यूझीलंडची फलंदाजी भारतीय खेळपट्ट्यांवर कमजोर ठरू शकते. याच मुद्द्यावर बोलताना स्मिथ म्हणाले,
“केन विलियम्सन बाहेर झाल्यानंतर तुम्हाला एका अनुभवी खेळाडूची गरज पडेल. केन असता तर मी या मुद्द्यावर बोललो नसतो. मात्र, तो नसल्याने मी म्हणेल की मार्टिन गप्टिल याला पुन्हा एकदा संधी द्यावी.”
ते पुढे म्हणाले,
“त्याला तुम्ही बाहेरच केले आहे का? कारण यावर्षी सुरुवातीला भारत दौऱ्यावर तो संघात नव्हता. त्याच्या जागी संधी दिलेला फिन ऍलन अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. दिवंगत मार्टिन क्रो म्हणत असे, तुमच्या सर्व तम खेळाडूला सर्वाधिक चेंडू खेळायला दिले पाहिजेत. माझ्यासाठी आता तो गप्टिल आहे.”
मागील वर्षीपासून गप्टिल न्यूझीलंड संघातून बाहेर आहे. टी20 विश्वचषकात तो संघाचा भाग होता. मात्र, त्याला अंतिम अकरामध्ये फारशी संधी मिळाली नाही.
(Ian Smith Back Martin Guptill For ODI World Cup After Kane Williamson Unavailablity)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पदार्पण अर्जुनचे, पण मैफील लुटली वडील सचिन तेंडुलकरने, ‘दादा’ अन् बच्चनला रिप्लाय देत म्हणाला…
जेवणासाठी तिलक वर्माच्या घरी पोहोचला मुंबईचा आख्खा संघ! स्वतः सचिननही होता उपस्थित