नॉटिंगहॅम। गुरुवारी(20 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात 26 वा सामना बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 48 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात बांगलादेशला पराभव स्विकारावा लागला असला तरी सौम्य सरकारने घेतलेल्या तीन विकेट्सची चांगलीच चर्चा झाली.
या सामन्याआधी त्याने वनडेमध्ये केवळ 1 विकेट घेतली होती. तर या सामन्यात त्याने थेट डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच आणि उस्मान ख्वाजा या खेळाडूंची विकेट घेतली.
त्याचबरोबर त्याने जेव्हा 21 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचची 53 धावांवर विकेट घेतली तेव्हा त्याने पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या स्टाईलची कॉपी करत सेलिब्रेशन केले.
सरकारच्या या सेलिब्रेशनचा फोटो आणि त्याच्याबरोबरच रोनाल्डोच्या सेलिब्रेशनचा फोटो कोलाज करुन आयसीसीने सोशल मीडियावर विश्वचषकाच्या अकाउंटवरुन शेअर केला आहे. तसेच या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘जन्मावेळी वेगळे झाले आहेत का?’
Separated at birth?#CWC19 | #RiseOfTheTigers | #AUSvBAN pic.twitter.com/rLaVPm5HWZ
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 20, 2019
मात्र आयसीसीची ही पोस्ट अनेक चाहत्यांना पटलेली नसल्याने त्यांनी आयसीसीच्या या पोस्टवर अनेक गमतीशीर प्रतिक्रीया देत ट्रोल केले आहे. तसेच अनेकांनी ही पोस्ट डिलिट करण्यासही सुचविले आहे.
After seeing this Cristiano Ronaldo don't want live any more pic.twitter.com/cApHalRkSQ
— Pahari Choru🇮🇳 (@chamb_yal) June 20, 2019
— Hemant (@hemantmishira) June 20, 2019
https://twitter.com/niharfc/status/1141671193654657024
Delete
— ! (@GoaIKepa) June 20, 2019
Ronaldo be like … pic.twitter.com/7RGmtv54kc
— Jai (@jaisig) June 21, 2019
Listen to children pic.twitter.com/PgPWSkOiWm
— Santra Republic (@santrarepublic) June 21, 2019
गुरुवारी झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 381 धावा केल्या होत्या. यानंतर 50 षटकात विजयासाठी 382 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशने शेवटपर्यंत चांगली लढत दिली होती. पण त्यांना 50 षटकात 8 बाद 333 धावाच करता आल्या.
ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने 166 धावांची शतकी खेळी, तर ऍरॉन फिंच(53) आणि उस्मान ख्वाजाने(89) अर्धशतकी खेळी केली. बांगलादेशकडून गोलंदाजीत सौम्य सरकारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर रेहमानने 1 विकेट घेतली.
बांगलादेशकडून मुशफिकूर रहिमने 102 धावांची नाबाद शतकी खेळी केली. तर तमीम इक्बाल(62) आणि महमुद्दलाहने(69) अर्धशतकी खेळी केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि नॅथन कुल्टर नाईलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तसेच ऍडम झम्पाने 1 विकेट घेतली.
सौम्य सरकारने ऑस्ट्रेलिया विरुद्ध घेतलेल्या तीन विकेट-
Soumya Sarkar was the pick of the @BCBTigers bowlers with three wickets to his name.
Watch the Aussie batsmen fall here ⤵#RiseOfTheTigers | #CWC19 pic.twitter.com/UYDUqhYV14
— ICC (@ICC) June 20, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–धवनच नाही तर हे खेळाडूही झाले आहेत विश्वचषक २०१९ मधून बाहेर
–न्यूझीलंडच्या या खेळाडूने कर्णधार विलियम्सनला केले ट्रोल, जाणून घ्या कारण
–ऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामन्यात घडला इतिहास; विश्वचषकात पहिल्यांदाच झाले असे