---Advertisement---

धोनीपासून वाचण्यासाठी आयसीसीने फलंदाजांना दिला हा खास सल्ला

---Advertisement---

वेलिंगटन। रविवारी(3 फेब्रुवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्धचा पाचवा वनडे सामना 35 धावांनी जिंकत पाच सामन्यांची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.

या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीने चतुराईने न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशामला धावबाद केले होते. त्याचे हे कौशल्य बघता आयसीसीनेही (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) फलंदाजांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

ट्विटरवर एका युजरने ‘आम्हाला असा एक सल्ला द्या ज्यामुळे आमचे जीवन सुखी होईल’ असे ट्विट केले होते.

‘धोनी स्टम्पच्या मागे असेल तर फलंदाजांनी आपली क्रिझ सोडू नये’, असे उत्तर आयसीसीने या युजरला दिले आहे.

https://twitter.com/ICC/status/1092062328907071488

न्यूझीलंडच्या फलंदाजीवेळी 36.2 षटकात केदार जाधवने टाकलेल्या फिरकी चेंडूवर केदार आणि धोनीने निशाम पायचीत असल्याचे अपील केले होते. पण पंचांनी त्याला नकार दिला. यावेळी निशामचे पंचाकडेच लक्ष असल्याने आणि तो क्रिजच्याही बाहेर असल्याने चतूर धोनीने हेरले आणि चपळाईने त्याला धावबाद केले.

https://twitter.com/aadi_9110/status/1092077383807492097

महत्त्वाच्या बातम्या-

पंड्यावर कडाडून टीका करणारा दिग्गज क्रिकेटपटू आता करतोय त्याचेच कौतुक

एकेकाळी यो-यो टेस्टही पास न होणारा खेळाडू झाला टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू

नुसताच खेळाडू म्हणून नाही तर कर्णधार म्हणूनही रोहित विराटला ठरणार सरस

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment