---Advertisement---

BREAKING: वर्ल्डकपचे काउंटडाऊन सुरू! वेळापत्रक झाले जाहीर, अहमदाबादमध्ये होणार उद्घाटनाचा सामना

On: मंगळवार, जून 27, 2023 12:32 PM
---Advertisement---

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात आयसीसी वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. या विश्वचषकासाठी वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) करण्यात आली. विश्वचषकाचा उद्घाटनाचा सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तर, अंतिम सामना देखील याच मैदानावर 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे.

आयसीसीने यापूर्वी 27 जून रोजी वेळापत्रक घोषित करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग व काही आयसीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. भारतातील दहा शहरांमध्ये हा विश्वचषक खेळला जाईल. तब्बल 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला पाच ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे सुरुवात केली. तर अंतिम सामना 20 नोव्हेंबर रोजी होईल.

भारताने यापूर्वी तीन वेळा वनडे विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केले आहे. मात्र, त्यावेळी भारतीय उपखंडातील इतर देशही सहआयोजक असत. यावेळी केवळ भारतच या विश्वचषकाचे आयोजन करत आहे. नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, धर्मशाला बेंगलोर, हैदराबाद, पुणे व लखनऊ येथे विश्वचषकातील सामने खेळले जातील. तर मोहली व गुवाहाटी येथे काही सराव सामने होणार आहेत.

विश्वचषकातील पाहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला जाईल. हे दोन संघ मागील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भिडले होते. विशेष म्हणजे 1996 नंतर प्रथमच यजमान देश विश्वचषकातील पहिला सामना खेळणार नाही. भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध करेल.

(ICC Announced Schedule Of 2023 ODI World Cup India Opening Match At Narendra Modi Stadium Ahmedabad)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---