यावर्षी म्हणजेच 16 ऑक्टोबर, 2022 पासून ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी आयसीसीने पंच आणि सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. या स्पर्धेत तब्बल 16 पंचांच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे. विशेष म्हणजे, या पंचांमध्ये भारतीय पंचाचाही समावेश असणार आहे. ते पंच इतर कुणी नसून नितीन मेनन आहेत.
फक्त एकमेव भारतीय पंच
नितीन मेनन हे आयसीसी पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये सामील असलेले एकमेव भारतीय पंच आहेत. तसेच, ते ऑस्ट्रेलियातही पोहोचले आहेत. आयसीसीने या स्पर्धांच्या पहिल्या टप्प्यात आणि सुपर 12 फेरीसाठी त्यांची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.
आयसीसीने एका निवेदनात म्हटले की, “एकूण 16 पंच स्पर्धेत पंचाची भूमिका पार पाडतील. जेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता, तेव्हा रिचर्ड केटलबरो, नितीन मेनन, कुमार धर्मसेना आणि मराईस इरास्मस यांनी 2021च्या अंतिम सामन्यात पंचाची भूमिका पार पाडली होती.”
Nitin Menon is one of 16 umpires that'll be officiating during the ICC T20 World Cup in Australia.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 4, 2022
आयसीसी सामना अधिकाऱ्यांच्या पॅनेलचे मुख्य सामना अधिकारी रंजन मदुगले हेदेखील चार माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी एक आहेत, जे सामना अधिकारी असतील. यामध्ये मदुगले यांच्यासोबत झिम्बाब्वेचे एँड्र्यू पायक्रॉफ्ट, इंग्लंडचे ख्रिस्तोफर ब्रॉड आणि ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून यांचा समावेश आहे.
पॉयक्रॉफ 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पहिल्या फेरीतील श्रीलंका आणि नामीबिया यांच्यातील सामन्यात सामना अधिकारी असतील. तसेच, जोएल विल्सन आणि रॉडनी टकर पंचाची भूमिका पार पाडतील. पॉल रीफेल टीव्ही पंच आणि इरास्मस हे चौथे पंच असतील.
इरास्मस, टकर आणि अलीम दर यांचा हा सातवा टी20 विश्वचषक असेल. आयसीसीने सांगितले आहे की, उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठीच्या सामना अधिकाऱ्यांची घोषणा नंतर केली जाईल.
सामना अधिकारी आणि पंचांची यादी खालीलप्रमाणे
सामना अधिकारी– एँड्र्यू पायक्रॉफ्ट, ख्रिस्तोफर ब्रॉड, डेव्हिड बून, रंजन मदुगले
पंच– एड्रियन होल्डस्टोक, अलीम दर, अहसान रजा, ख्रिस्तोफर ब्राऊन, ख्रिस्तोफर गाफाने, जोएल विल्सन, कुमार धर्मसेना, लेंगटन रूसेरे, मराईस इरास्मस, मायकल गॉ, नितीन मेनन, पॉल रीफेल, पॉल विल्सन, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, रॉडनी टकर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोलंदाजांना घाम फोडणारा बेअरस्टो उभा राहण्यासाठी करतोय संघर्ष; कारकीर्दीबाबत म्हणाला, ‘आता बस…’
विश्वचषकातून बाहेर गेलेला बुमराह अशी देणार टीम इंडियाला साथ, करणार ‘हे’ काम