१३ जानेवारी पासून सुरु होणारी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा २०० पेक्षा जास्त देशात टीव्ही आणि डिजिटल कव्हरेजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. आयसीसीचे ग्लोबल मीडिया पार्टनर असणारे स्टार या स्पर्धेतील सामने प्रसारित करणार आहे.
२०४ देशात होणाऱ्या डिजिटल कव्हरेज बरोबरच १०२ देशात या स्पर्धेचे टीव्हीवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. यामुळे जगभरात १.३ बिलियन प्रेक्षकांना हे सामने बघता येणार आहेत.
तसेच ७० देशात हॉटस्टारवरून हे सामने चाहत्यांना पाहता येणार आहे. यात भारतीय उपखंड, कॅनडा, मध्य आशिया,युएसए आणि पॅसिफिक बेटांचा समावेश आहे.
भारत तसेच भारतीय उपखंडात स्टार स्पोर्ट्स या चॅनेलवरून हे सामने प्रदर्शित होणार आहेत. या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून सौरव गांगुली, टॉम मूडी, इयान बिशप आणि ग्रांट इलियट यांचा समावेश असेल.
या स्पर्धेच्या प्रक्षेपणाचा चाहत्यांना लाईव्ह, हायलाईट्स, व्हिडीओ क्लिप्स, लाईव्ह स्कोर, बातम्या आणि विश्लेषण अशा अनेक मार्गांनी आनंद घेता येणार आहे.