आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसीने रविवारी (२७ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम महिला संघांची घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या दशकातील सर्वोत्तम महिला टी२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू मेग लॅनिंग हिला देण्यात आले आहे. या दोन्ही संघात प्रत्येकी दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंना स्थान मिळाले आले आहे.
हे संघ निवडण्यासाठी १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० हा कालावधी लक्षात घेतला आहे. याशिवाय या कालावधीत ५ वर्षे खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनाच संघात स्थान दिले आहे.
दशकातील सर्वोत्तम टी२० महिला संघ
आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम महिला टी२० संघात हरमनप्रीत कौर आणि पुनम यादव या भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एलिसा हिली हिच्यावर संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिसा पेरी आणि वेगवान गोलंदाज मेगन शट यांचीही या संघात निवड झाली आहे.
न्यूझीलंडची अष्टपैलू क्रिकेटपटू सुझी बेट्स आणि सोफी डिवाइन यांनाही आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम महिला टी२० संघात संधी मिळाली आहे. तर वेस्ट इंडिजची कर्णधार स्टिफन टेलर व संघसहकारी डेन्ड्रा डॉटीन यांचाही या संघात समावेश आहे. सोबतच ऍना श्रुबसोल या एकमेव इंग्लंड क्रिकेटपटूची या संघात निवड झाली आहे.
दशकातील सर्वोत्तम वनडे महिला संघ
आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम वनडे संघात मिताली राज आणि झुलन गोस्वामी या भारतीय क्रिकेटपटूंना संधी देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एलिसा हिली, एलिसा पेरी यांना टी२० सह वनडे संघातही स्थान मिळाले आहे. न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्स आणि वेस्ट इंडिजची क्रिकेटपटू स्टिफन टेलर यांनाही टी२०बरोबर वनडेतही संधी मिळाली आहे.
इंग्लंडची महिला क्रिकेटपटू सारा टेलर हिच्यावर वनडे संघाच्या यष्टीरक्षकणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकाच्या दोन महिला क्रिकेटर डेन वॉन निकर्क आणि मेरीझन कॅप यांना वनडेत स्थान मिळाले आहे. याबरोबरच वेस्ट इंडिजची गोलंदाज अनिसा मोहम्मद हिचीही संघात निवड झाली आहे.
The ICC Women's T20I Team of the Decade ????
Plenty of runs and wickets in that side! ???? #ICCAwards pic.twitter.com/mRkVN1SHSf
— ICC (@ICC) December 27, 2020
असा आहे आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम महिला टी२० संघ –
एलिसा हिली (यष्टीरक्षक), सोफी डिवाइन, सुझी बेट्स, मेग लॅनिंग (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्टिफन टेलर, डेन्ड्रा डॉटीन, एलिसा पेरी, ऍना श्रुबसोल, मेगन शट आणि पुनम यादव
The ICC Women's ODI Team of the Decade ????
???????? ???????? ????????
???????? ????????
???????? ????????
???? ????
????????
???????????????????????????? #ICCAwards pic.twitter.com/NxiF9dbnt9— ICC (@ICC) December 27, 2020
असा आहे आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम महिला वनडे संघ –
एलिसा हिली, सुझी बेट्स, मिताली राज, मेग लॅनिंग (कर्णधार), स्टिफन टेलर, सारा टेलर (यष्टीरक्षक), एलिसा पेरी, डेन वॉन निकर्क, मेरीझन कॅप, झुलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद
महत्त्वाच्या बातम्या-
पाहुणा नंबर १..! मेलबर्नच्या मैदानावर ‘अशी’ कामगिरी करणारा अजिंक्य रहाणे पहिलाच परदेशी क्रिकेटर
व्वा रे अजिंक्य! भारतात तर केलीच पण या ५ देशातही ठोकलीत दमदार शतकं