Jay Shah :- काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा हे आयसीसी चेअरमन बनणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता लवकरच त्याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे. शुक्रवारपासून (18 जुलै) श्रीलंकेतील कोलंबो येथे आयसीसीची बैठक होणार आहे. या बैठकीत शहा हे केंद्रस्थानी असतील. यासोबतच 2025 चॅम्पियन ट्रॉफीबाबत देखील महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात.
मागील पाच वर्षांपासून बीसीसीआयचे सचिव असलेल्या जय शहा यांच्याकडे आगामी आयसीसी चेअरमन म्हणून पाहिले जात आहे. सध्याचे अध्यक्ष असलेल्या न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात समाप्त होतोय. त्यानंतर नव्या चेअरमनसाठी निवडणूक होईल. शहा यांनी रस दाखवल्यास त्यांची या पदावर बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. मात्र, शहा काय निर्णय घेतात? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
आयसीसीच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, “शहा आयसीसी अध्यक्ष बनणार हे निश्चित वाटते. मात्र, ते कधी अध्यक्ष बनतात याबाबत सांगता येत नाही. बार्कले यांना अजून एक वर्ष वाढवून दिल्यास तिकडे बीसीसीआयमध्ये शहा यांना सहा वर्षे पूर्ण होतील. त्यानंतर 2025 मध्ये शहा आयसीसी चेअरमन बनल्यास त्यांच्याकडे पूर्ण तीन वर्ष या पदावर काम करण्यासाठी असतील. यादरम्यान त्यांचा बीसीसीआयमधील कूलिंग पिरेड देखील पूर्ण होईल. त्यामुळे 2028 मध्ये ते बीसीसीआय अध्यक्ष म्हणून पुन्हा वापसी करू शकतात.”
त्यामुळे शहा आयसीसी चेअरमन कधी बनतात?, याकडे सर्वांची नजर असेल. याच बैठकीत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीबाबत देखील अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या ही स्पर्धा पाकिस्तानात होणार असल्याने भारतीय संघ तिथे जाण्याची शक्यता कमी दिसते. त्यामुळे बीसीसीआय आयसीसीकडे हायब्रीड मॉडेलची मागणी करू शकते. यामध्ये भारतीय संघ आपले सामने श्रीलंका किंवा युएई येथे खेळेल. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काय प्रतिक्रिया देते? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषक 2024 दरम्यान आयसीसीचे तब्बल 167 कोटींचे नुकसान, पण काय आहे यामागचे कारण?
IND vs SL : प्रशिक्षक गंभीरमुळे चमकणार ‘या’ गोलंदाजाचे नशीब! 3 वर्षांपासून पुनरागमनाची पाहतोय वाट
‘स्पीड गन’ उमरान मलिक या कारणमुळे संघाबाहेर! गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी सांगितले खळबळजनक रहस्य