---Advertisement---

एशिया कप स्पर्धेला आयसीसीने दिला वनडे क्रिकेटचा दर्जा

---Advertisement---

शनिवार, 15 सप्टेंबरपासून एशिया कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीचा वनडे दर्जा नसलेला हाँग काँगचा संघ पात्रता फेरी जिंकून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

त्यामुळे आता आयसीसीने एशिया कप स्पर्धेला वनडे क्रिकेटचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेतील सर्व सामने 50 षटकांचे म्हणजे वनडे सामने होणार आहे.

याबद्दल आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले, “आयसीसीने एशिया कपच्या सर्व सामन्यांना वनडेचा दर्जा देणे हे एक सकारात्मक पाउल आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाढवण्यासाठी आणि जे चाहते आधीच खेळ पाहातात असे एक अब्ज चाहते वाढवण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या रचनेचा आढावा घेत आहोत.”

“यावर्षी झालेल्या आयसीसी विश्वचषक पात्रता फेरी स्पर्धेचा पुर्नआढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेत वनडे क्रिकेटचा दर्जा असलेले आणि नसलेले अशा दोन्ही संघात मिश्र सामने खेळवण्यात आले होते, ज्यामुळे चाहत्यांचा गोंधळ झाला.”

“त्यामुळे अशी परिस्थिती सोपी करण्यासाठी आम्ही ज्या स्पर्धांमध्ये आयसीसीचा वनडे दर्जा असलेले जास्त संघ असतील आणि काही वनडेचा दर्जा नसलेले संघ असतील अशा सर्व स्पर्धांमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या नियमानुसार सर्व सामने वनडेचे होतील. या स्पर्धांमध्ये एशिया कप, विश्वचषक पात्रता फेरी यांचाही सामावेश आहे.”

याबरोबरच रिचर्डसन पुढे म्हणाले, “अशा स्पर्धा या सध्या वनडे दर्जा असाणाऱ्या 16 संघांव्यतिरिक्त अन्य संघांसाठीही खुल्या असतात हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे यांमधील सर्व सामन्यांना वनडेचा दर्जा दिल्याने त्याचा स्पर्धेला आणि या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघांसाठी फायदेशीर आहे.”

त्याचबरोबर ते म्हणाले, “नक्कीच आयसीसीचे सदस्य असणाऱ्या सर्व संघांना आंतरराष्ट्रीय टी20चा दर्जा देण्यात आला आहे आणि आम्ही वनडे दर्जाच्या बाबतीतही सखोल पुर्नआढावा घेऊ. हा पुर्नआढावा पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल.”

एशिया कप 2018मध्ये हाँग काँग हा एकच संघ असा आहे, ज्याला वनडेचा दर्जा नाही. ते या स्पर्धेत साखळी फेरीत 16 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध आणि 18 सप्टेंबरला भारताविरुद्ध खेळणार आहेत.

तसेच हाँगकाँग व्यतिरिक्त या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

ही स्पर्धा 15 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबई आणि अबुधाबी येथे होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

रोहित शर्माला मिळाल्या युजवेंद्र चहलकडून बॅटींगच्या टिप्स

झुलन गोस्वामी ठरली सर्वात यशस्वी महिला गोलंदाज; मिताली राजचाही विश्वविक्रम

अॅलिस्टर कूकच्या कारकिर्दीचा शेवट गोड; जे सचिन, द्रविडलाही जमले नाही ते कूकने करुन दाखवले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment