आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शोहिदुल इस्लामला मार्चमध्ये डोप टेस्ट ऑफ टूर्नामेंटमध्ये अपयशी ठरल्याने त्याच्यावर १० महिन्यांची बंदी घातली. शोहिदुलच्या यूरीनच्या नमुन्यात क्लोमिफेन आढळून आले, ज्याला डबल्यूएडीएच्या प्रतिबंधित यादीत नमूद केलेल्या पदार्थांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. स्पर्धेच्या आत आणि बाहेरही बंदी आहे.
त्याच्या यूरीनचा नमुना आयसीसीच्या स्पर्धेबाहेरच्या चाचणी कार्यक्रमाचा भाग म्हणून घेण्यात आला होता. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, “बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शोहिदुल इस्लामवर आयसीसीच्या उत्तेजक विरोधी संहितेच्या कलम २.१ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याच्यावर १० महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.” उल्लंघन मान्य केल्यानंतर, शोहिदुलवर १० महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली आहे.
आयसीसीने निलंबित करताना मात्र शोहिदुलने अनावधानाने प्रतिबंधित पदार्थाचे औषधाच्या स्वरूपात सेवन केल्याची पुष्टी केली, जी त्याला उपचारासाठी देण्यात आली होती. ही १० महिन्यांची बंदी २८ मे पासून सुरू होणार आहे, ज्यामुळे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज २८ मार्च २०२३पर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही.
२७ वर्षीय बांगलादेशसाठी फक्त एक आंतरराष्ट्रीय टी२० खेळला आहे ज्यामध्ये त्याने पाकिस्तानने ३-० ने जिंकलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मोहम्मद रिझवानची विकेट घेतली होती.
दरम्यान, याआधी अनेक खेळाडूंना अशाप्रकारे विनापरवानगी औषधाेचे सेवन केल्याच्या कारणामुळे क्रिकेट खेळण्यापासून रोखण्यात आले होते. या यादीमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याचा देखील समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘विराटपेक्षा बाबर कडून जास्त अपेक्षा’, पाकिस्तानच्या खेळाडूने केली दिग्गजांची तुलना
लॉर्ड्समध्ये चमकला चहल! ४ विकेट्स घेत मोडलाय ३९ वर्षे जुना विक्रम, एक नजर टाकाच
रोहित अन् विराटची यारी, जगात भारी! भारतीय कर्णधाराने पुन्हा एकदा केली किंग कोहलीची पाठराखण