आयसीसीने नुकतीच संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईच्या एका खेळाडूवर मोठी कारवाई केली आहे. कादिर अहमद खान असे या खेळाडूचे नाव आहे. आयसीसीने या खेळाडूवर तब्बल ५ वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक नियमावलीचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आता या कारवाईमुळे पुढची ५ वर्षे कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटपासून त्याला दूर राहावे लागणार आहे. आयसीसीनं गेल्या आठ दिवसांमध्ये केलेली ही तिसरी कारवाई आहे. कादिर खानवर हे आरोप २०१९ मध्येच लावण्यात आले होते.
आयसीसीने जरी केलेल्या पत्रकानुसार कादिरवरील बंदीचा कालवधी १६ ऑक्टोबर २०१९ पासून मोजला जाईल. कारण त्याच दिवसापासून त्याच्यावर तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार कादिरने त्याच्यावरील आरोपांचा स्विकार केला आहे.
हे प्रकरण २०१९ साली युएई आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेदरम्यान घडले होते. या मालिके दरम्यान भ्रष्टाचार संबंधी प्रकरणाबाबत माहिती असून देखील त्याने आयसीसीला याबाबत माहिती देणे टाळले होते. अशा प्रकारच्या सहा बाबतीत त्याने नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच्यावर आयसीसीने ही कारवाई केली आहे.
याबाबत बोलतांना आयसीसीचे अधिकारी अलेक्स मार्शल म्हणाले, “कादिर खान एक अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. ज्याने भ्रष्टाचार विरोधी प्रशिक्षण देखील पूर्ण केले आहे. त्याने गैरप्रकारांपासून स्वतःला वाचवायला हवे होते. तसेच याबाबतची माहिती देखील तातडीने आयसीसीच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीला द्यायला हवी होती.”
कादिर खानने डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. या ३५ वर्षीय खेळाडूने निलंबनाच्या आधी युएईतर्फे ११ वनडे आणि १० टी२० सामन्यात भाग घेतला आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट २०१९ मध्ये खेळला होता.
महत्वाच्या बातम्या:
रोहित-धोनीनंतर आता मॉर्गनवर देखील होणार कारवाई, हे आहे कारण
पॅट कमिन्सने सॅम करनला एकाच षटकात ठोकल्या ३० धावा, गेल-रैना-कोहली यांच्या पंक्तीत मिळवले स्थान
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय खेळाडू आघाडीवर, पाहा कोणाचा आहे टॉप ५ मध्ये समावेश