भारत पाकिस्तानविरुद्ध ४ जून रोजी बर्मिंगहॅम येथे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं अभियान सुरु करणार आहे. भारत गतविजेता म्हणून या स्पर्धेत उतरणार आहे. परंतु बुकींनी इंग्लंड संघाला विजेतेपदासाठी पसंती दिली आहे तर भारत पाकिस्तान सामन्यात भारतावर मोठा सट्टा लागला आहे.
जगातल्या क्रिकेटमधील दिग्गज ८ टीम या स्पर्धेत खेळणार असून बांगलादेश आणि यजमान इंग्लंडच्या १ जून रोजी होणाऱ्या सामन्याने स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. इंग्लंड गेल्यावर्षी भारताविरुद्ध जरी चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरीमध्ये पराभूत झाली असेल तरी या वर्षी त्यांना ही ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
काही रिपोर्ट्सनुसार बुकींनी भारताला ४थ्या क्रमांकाची पसंती दिली असून इंग्लंड पाठोपाठ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पसंती देण्यात आली आहे.
तरीही सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा ह्या ४ जून रोजी होणाऱ्या भारत- पाकिस्तान सामन्यावर आहेत. बुकींनी भारतावर ५० पैसे तर १.४४ रुपये पाकिस्तानवर लावले आहेत.
We have been on fire today! Here's @OwenSFulda Top 5 #ICCChampionsTrophy tips for the tournament starting tomorrow! https://t.co/0Bp4kZjeCY
— Easyodds.com (@easyodds) May 30, 2017
बुकींनी इंग्लंड संघावर ४ रुपये, ऑस्ट्रेलियावर ४.४ रुपये, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४.७ रुपये आणि भारतावर ५.९ रुपये ऑफर केले आहेत. या यादीत बांगलादेश शेवटच्या क्रमांकावर असून श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूजीलँड त्यावरती आहेत.
यात जेवढी कमी किंमत तेवढा संघाचा विजयी होण्याची संधी जास्त असं भाकीत वर्तवलं जात.
याचा अर्थ जर कुणी इंग्लंडवर १०० रुपये लावले आणि इंग्लंड स्पर्धा जिंकले तर त्या व्यक्तीला ४०० रुपये मिळतील. जर बांगलादेशवर कुणी १०० रुपये लावले आणि बांगलादेश जर स्पर्धा जिंकले तर ६,५०० रुपये मिळतील.
https://twitter.com/CricketNewsAus/status/869288845455634433?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Ficc-champions-trophy-2017%2Ficc-champions-trophy-india-favourite-vs-pakistan-bookies-bet-on-eng-to-win-cup%2Fstory-FWhME0su6Vyw5yT3ZYYZiI.html
डेविड वॉर्नर स्पर्धेत सर्वात जास्त धावा करण्यावर बुकींनी सर्वात कमी भाव दिला आहे. वॉर्नर १०रुपये, विराट ११ रुपये, स्मिथ १२ रुपये तर ज्यो रूट ११.५ रुपये, एबी डिव्हिलियर्स १४.५ रुपये याप्रमाणे बुकींनी खेळाडूंचं रेट कार्ड बनवलं आहे. गोलंदाजांत मिशेल स्टार्स ९.८ रुपये, आदिल रशीद, इम्रान ताहीर आणि बुमराह यांना पसंदी देण्यात आली आहे.