आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy) 2025 मध्ये खेळली जाणार आहे. त्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’ने (ICC) वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्ता- न्यूझीलंड संघात (19 फेब्रुवारी) रोजी होणार आहे. भारतपाकिस्तान संघ (23 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने असणार आहेत. भारताचा पहिला सामना बांगलादेशशी होणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे.
भारत (20 फेब्रुवारी) पासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. यानंतर भारताची स्पर्धा पाकिस्तानशी होईल. भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना (2 मार्च) रोजी दुबईत होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना दुबईत तर दुसरा सेमीफायनल सामना लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे. फायनल सामन्यासाठी 2 शहरांची निवड करण्यात आली आहे.
‘आयसीसी’ने फायनल सामन्यासाठी 2 ठिकाणे निवडली आहेत. यातील पहिले ठिकाण लाहोरचे गद्दाफी स्टेडियम आहे. तर दुसरे ठिकाण दुबई क्रिकेट स्टेडियम आहे. वास्तविक ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जात आहे. त्यामुळे भारत फायनलमध्ये पोहोचल्यास हा सामना दुबईत होणार आहे. भारत फायनलमध्ये पोहोचला नाही तर हा सामना लाहोरमध्ये खेळवण्यात येणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे वेळापत्रक –
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
4 मार्च – सेमीफायनल 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
5 मार्च – सेमीफायनल 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
9 मार्च – फायनल, गद्दाफी स्टेडियम, लाहोर (भारत फायनलमध्ये पोहोचल्यास ठिकाण दुबई असेल)
Check out the full fixtures for the ICC Champions Trophy 2025. pic.twitter.com/oecuikydca
— ICC (@ICC) December 24, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; गिल, पंत, जयस्वालबद्दल कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य! म्हणाला….
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फिट झाला हा मॅचविनर गोलंदाज
याला म्हणतात कमिटमेंट! या भारतीय खेळाडूने दुखापत होऊनही सराव थांबवण्यास नकार दिला