आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) आयोजन पाकिस्तानकडे असणार आहे. चॅम्पियन्स ट्राॅफी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळवली जाण्याची शक्यता आहे. आता आयसीसी अधिकाऱ्यांची एक टीम पाकिस्तानमध्ये 10 ते 12 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेणार आहे. एका पाकिस्तानी मीडियाच्या चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांना पाठवण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबर रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी संबंधित कार्यक्रम होणार आहे ज्यामध्ये क्रिकेटपटूंसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाला मंजुरी मिळू शकते. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीचे काही अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानात पोहोचले होते. एकीकडे पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी तयारी करत आहे, पण चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत भारताची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही.
पाकिस्तानने आयसीसीला पाठवलेल्या वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळवली जाणार असून 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेचे सामने कराची, रावलपिंडी आणि लाहोर येथे होणार आहेत. फायनलसह 7 सामने लाहोरमध्ये खेळवले जातील, तर दोन्ही गटातील पहिले सामने आणि पहिला सेमीफायनल सामना कराचीमध्ये खेळवला जाईल. दुसरीकडे रावलपिंडीच्या मैदानावर दुसऱ्या सेमीफायनलसह 5 सामने खेळवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Mega Auction; मेगा लिलावात अनसोल्ड ठरू शकतो इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज?
“भारतीय कोचिंग स्टाफमध्ये अभिषेक नायरची भूमिका काय?” माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
BGT 2024-25; रोहित शर्माची जागा घेणार केएल राहुल?