भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज कारकिर्दीतील ३००वा एकदिवसीय सामना खेळत आहे. जेव्हा आज युवी भारत बांगलादेशविरुद्ध आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उपांत्यफेरीत खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा तो त्याचा ३००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना राहील. यापूर्वी भारताकडून सचिन (४६३), द्रविड(३४०), अजहरुद्दीन(३३४), गांगुली (३०८) यांनी ही कामगिरी केली आहे.
जगातील १८ खेळाडूंनी ३०० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे महान फलंदाज ब्रायन लारालाआपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ३०० सामने खेळण्याचं भाग्य लाभलं नाही. लाराने २९९ एकदिवसीय सामन्यात खेळताना १०४०५ धावा केल्या आहेत.
भारताच्या माजी कर्णधार एमएस धोनीचा उद्याचा सामना हा २९० वा सामना असेल. युवराज सिंगने आजपर्यन्त भारताकडून अनेक सामना जिंकून देणाऱ्या खेळी खेळल्या असल्या तरी आयसीसीच्या तो खेळलेल्या सर्व स्पर्धा त्याने गाजविल्या आहेत.
त्यातील काही खास खेळी
#१ २००० साली नैरोबीमध्ये केनिया विरुद्ध आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येच पदार्पण. फलंदाजीची संधी मिळाली नाही. पुढच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध ८० चेंडूत ८४ धावांची खेळी.
#२ २००३ साली भारताने पाकिस्तानचा विश्वचषकात पराभव केला. त्या सामन्यात युवीने नाबाद अर्धशतकी खेळी केली होती.
#३ ७२ चेंडूत ६२ धावांची खेळी २००२ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोलोम्बो येथे
#४ २००२ साली ६९ धावांची खेळी नेटवेस्ट ट्रॉफीमध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड क्रिकेट मैदानावर यजमान इंग्लंड विरुद्ध
#५ २०११ विश्वचषकात ९०.५० च्या सरासरीने ३६२ धावा आणि १५ विकेट्स. युवराजला मालिकावीर म्हणून घोषित केले.
#६ जानेवारी २०१७ मध्ये इंग्लंड विरुद्ध १२७ चेंडूत १५० धावांची खेळी
#७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये पाकिस्तान विरुद्ध ३२ चेंडूत ५३ धावांची खेळी. सामनावीर म्हणून घोषित
#८ सलग ३ सामन्यात पाकिस्तान विरुद्ध २००६ साली नाबाद ८२, नाबाद ७९ आणि नाबाद १०७ धावांची खेळी