विश्वचषक क्वालिफायर्सच्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंका आणि यूएई संघ आमने सामने होते. सोमवारी (19 जून) खेळल्या गेलेल्या या सामन्यात वानिंदू हसरंगाने जबरदस्त प्रदर्शन केले आणि संघाला विजय मिळवून दिला. हसरंगाने तब्बल 6 विकेट्स या सामन्यात घेतल्या आणि हे त्याचे सर्वोत्तम वनडे प्रदर्शन देखील ठरले. श्रीलंकन संघाने या सामन्यात 175 धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले.
श्रीलंका आणि यूएई संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता होती. मात्र वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याच्या सहा विकेट्समुळे सामना अगदीच एकतर्फी झाला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 6 बाद 355 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यूएईने आपल्या सर्व विकेट्स 180 धावांवर गमावल्या. यूएई संघ 50 पैकी 39 षटके खेळू शखला.
हसरंगाने या सामन्यात 8 षटके गोलंदाजी केली आणि यात 3.00च्या इकॉनॉमीने 24 धावा खर्च करत 6 विकेट्स घेतल्या. यादरम्यान एक षटक त्याने निर्धाव ठाकले. हसरंगाची लेग ब्रेक गोलंदाजी यूएईच्या फलंदाजांसाठी सर्वात मोठी बाधा ठरल्याचे दिसले. त्याने मोहम्मद वसीम, बेसिल हमीद, आसिफ खान, रमीज शहजाद, अय़ान अफजल आणि मोहम्मद जवादुल्लाह यांच्या विकेट्स घेतल्या. या जबरदस्त प्रदर्शनासाठी सामना संपल्यानंतर त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामन्याच्या एकंदरीत विचार केला, तर श्रीलंका संघ फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये चमकदार कामगिरी करू शकला. पथून निसांका, दिमुथ करुनारत्ने, कुसल मेंडिस आणि सदीरा समरविक्रमा या पहिल्या चारही फलंदाजांनी श्रीलंकेसाठी अर्धशतके केली. यांनी अनुक्रमे 57, 52, 78 आणि 73 धावांची खेळी केली. परिणामी प्रथम फलंदाजी करणाऱ्या लंंकेला मोठी धावसंख्या उभी करता आली. दुसरीकडे यूएईचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. हसरंगा व्यतिरिक्त लाहिरू कुमारा, महीश थिक्षाणा आणि धनंजया डी सिल्वा यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. एल नासीर युएईसाठी सर्वात यशस्वा गोलंदाज ठरला, ज्याने 2 विकेट्स घेतल्या. (ICC Cricket World Cup Qualifier wanindu-hasaranga-took-6-wickets-for-24-runs-in-the-odi-against-uae)
महत्वाच्या बातम्या –
कमिन्सच्या घातक यॉर्करवर इंग्लिश फलंदाज फेल! बॅट-बॉलचा संपर्क होण्याआधीच उडाल्या दांड्या
“मला टीम इंडियाचा कर्णधार बनवणार होते पण…”, सेहवागने केला मोठा गौप्यस्फोट