जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 280 धावा आवश्यक आहेत. मात्र, त्याचवेळी चौथ्या दिवशी एक वादग्रस्त घटना या अंतिम सामन्यात घडली. भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल याचा कॅमेरून ग्रीन याने पकडलेला झेल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्टीकरण दिले आहे.
भारतीय संघाला या सामन्यात विजयासाठी शेवटच्या डावात 444 धावांचे आव्हान मिळाले आहे. शुबमन गिल आणि रोहित शर्मा दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर संघाला त्यांनी चांगली सुरुवात दिली होती. मात्र, डावातील अठराव्या षटकात गिल 18 धावा करून तंबूत परतला. या षटकात स्कॉट बोलॅंड गोलंदाजी करत असताना कॅमरून ग्रीन याने झेल टिपला. हा झेल संशयास्पद होता. मात्र, तिसरे पंच रिचर्ड केटलब्रो यांनी त्याला बाद घोषित केले. व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओत ग्रीनच्या हातातील चेंडू जमिनीला टेकल्याचे दिसते. या झेलामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
आता या प्रकरणावर आयसीसीने पुढे येत आपली प्रतिक्रिया दिली. आयसीसीने सोशल मीडिया पोस्ट करत लिहिले,
‘या प्रकरणात सॉफ्ट सिग्नलचा वापर केला गेला नाही. जून महिन्यात हा निर्णय काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे तिसरे पंच सर्व कॅमेरा ऍंगलमधून पाहून अंतिम निर्णय घेतात. ग्रीन याची बोटे सुरुवातीला चेंडूच्या खाली आली होती. पंचांना ज्यावेळी वाटेल की, चेंडू हातात व नियंत्रणात आहे तेव्हा ते फलंदाजालाबाद देतात. त्यानंतर पुढील प्रक्रियेत चेंडू जमिनीला लागला तरी फलंदाज नाबाद ठरत नाही. त्यामुळे गिल हा बाद ठरतो.’
सौरव गांगुली यांच्या नेतृत्वातील कमिटीने मे महिन्यातच शॉप सिग्नल नियम क्रिकेटमधून काढून टाकला आहे. इंग्लंड विरुद्ध आयर्लंड ही एकमेव कसोटी या नव्या नियमासह खेळली गेली होती.
(ICC Explain Why Shubman Gill Out In WTC Final When Cameron Green Took Catch)
महत्वाच्या बातम्या –
कसोटीत पाचव्या दिवसाचा बॉस आहे कोहली! ‘ही’ आकडेवारी उंचावतेय चाहत्यांच्या अपेक्षा
सचिननंतर विराटच! WTC फायनलचा मौका साधून ‘किंग कोहली’ने केला महापराक्रम