भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या विश्रांतीवर आहे. अशातच आयसीसीने त्याला एक खास सन्मान देऊ केला आहे. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी-२० मालिका खेळत आहे, ज्यामध्ये बुमराह मात्र सहभागी नाहीये. बुमराहने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या हातात एक लाल रंगाची कॅप दिसत आहे. ही कॅप त्याला आयसीसीकडून मिळाली आहे.
आयसीसीने (ICC) २०२० मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील प्लेअर ऑफ द डिकेड (दशताकील सर्वोत्तम खेळाडू) निवडले होते. टी-२० प्रकारात निवडलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाच्या चौघांचा समावेश होता. यामध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सोबतच, रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी या तिघांचा समावेश होता. धोनीला या संघाचा कर्णधारपदी निवडले गेले होते. आता या घोषणेच्या १८ महिन्यांनंतर आयसीसीने बुमराहला त्याची कॅप पाठवली आहे. टीम ऑफ द डिकेडमध्ये निवडला गेल्यानंतर बुमराहने सोशल मीडियावर खास पोस्ट करत फोटो शेअर केला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “या सन्मानासाठी धन्यवाद, आयसीसी.”
https://www.instagram.com/p/Celkck7qOsP/?utm_source=ig_web_copy_link
जसप्रीत बुमराहने भारतीय संघासाठी २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये बुमराहचे आकडे कमालीचे राहिले आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अवघ्या ६.५१च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या आणि ६७ विकेट्स नावावर केल्या आहेत. बुमराहने श्रीलंका संघाविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याला विश्रांती दिली गेली आहे.
A fast bowler par excellence ✨
Jasprit Bumrah with his ICC Men’s T20I Team of the Decade cap 👏 pic.twitter.com/Uilr65sGk4
— ICC (@ICC) June 10, 2022
बुमराह शक्यतो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असलेल्या सर्व गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम यॉर्कर टाकणारा गोलंदाज असू शकतो. त्याच्या जबरदस्त लाईन लेंथपुढे भल्याभल्या फलंदाजांनी गुडघे टेकल्याचे यापूर्वी पाहिले गेले आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून एकापाठोपाठ एक मालिका खेळत असल्यामुळे बीसीसीआयने बुमराह, विराट आणि रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान विश्रांती दिली आहे. पुढच्या महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असेल, तेव्हा हे सर्वजण पुन्हा संघात सहभागी होतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्ट्राईक देण्याच्या वादावर आशिष नेहराचा कार्तिकला पाठिंबा, पंड्याला झापत म्हणाला, ‘तिथं मी नव्हतो…’
आयपीएलने भारताला दिलेला पहिला टी२० स्टार होता युसुफ, इरफानचा भाऊ ओळख पुसत त्याने स्वत:ची बनवलेली ओळख
कसोटीत लाभलं शतकाचं सौभाग्य, पण वनडेत नाही करता आली शंभरी, पाहा कोण आहेत ‘ते’ क्रिकेटर्स