भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या एजबस्टन कसोटीत दारून पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतरही भारतीय संघाला काही झटके सोसावे लागले आहेत. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर आयसीसीने बुधवारी (६ जुलै) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला या क्रमवारीत सर्वात मोठा झटका मिळाला.
विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर कसोटी क्रमवारीमध्ये पहिल्या १० खेळाडूंमधून बाहेर झाला आहे. तब्बल ६ वर्षांनंतर असे झाले आहे की, विराट कोहली कसोटी क्रमवारीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये सहभागी नाहीये. विराट आता चार स्थानांच्या नुकसानासह १३ व्या क्रमांकावर घसरला आहे.
मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराटला एजबस्टन कसोटीतही काही कमाल दाखवता आली नाही. पहिल्या डावात त्याने ११, तर दुसऱ्या डावात २० धावा केल्या होत्या. विराट तब्बल २०५३ दिवसांना कसोटी क्रमवारीत पहिल्या १० फलंदाजांमधून बाहेर पडला आहे. त्याचे हे आकडे सांगतात की, विराटची कसोटी क्रिकेटमध्ये एकेकाळी एकहाती सत्ता होती.
कसोटी क्रमवारीत विराटचे सर्वोत्तम प्रदर्शन २०१८ मध्ये पाहिले गेले होते. तेव्हा त्याची रेटिंग ९३७ होती. आता जेव्हा विराट १३ व्या क्रमांकावर घसरला आहे, त्याची रेटिंग ७१४ आहे. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज आणि कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रुट सध्या कसोटी क्रमावारीत पहिल्या क्रमांकावर आहे. रुटकडे सध्या ९२३ रेटिंग पॉइंट्स आहेत.
दरम्यान, विराट कोहली मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्याने तब्बल अडीच वर्षांपासून एकही शतक केले नाहीये. २०१९ मध्ये मायदेशात बांगलादेशविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीत विराटने शेवटचे शतक केले होते. त्यानंतर आजपर्यंत त्याने ७५ आंतरराष्ट्रीय डाव खेळले, पण एकही शतक ठोकू शकला नाही. यादरम्यान विराटने ३६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मला अन्याय बिल्कुल आवडत नाही’, वॉर्नरच्या पत्नीचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर मोठे विधान
पाचवी कसोटी गाजवणाऱ्या रिषभ पंतची मोठी झेप, पहिल्यांदाच कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान