आयसीसीने शुक्रवारी पहिल्यांदाच महिलांची टी20 क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीत तीन वेळचा विश्वविजेता आॅस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी असून भारत पाचव्या स्थानी आहे.
आयसीसीने ही क्रमवारी जाहिर करण्याआधी सर्व सदस्य देशांना टी20 क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे. त्यामुळे या क्रमवारीत 46 संघांचा समावेश करण्यात आला आहे.
सहसदस्य देशांच्या क्रमवारीत अव्वल म्हणजेच 11 व्या स्थानी स्कॉटलँड असून थायलंड 12 व्या क्रमांकावर आहे.
जूनमध्ये झालेल्या महिला एशिया कप स्पर्धेनंतर आयसीसीने सर्व सदस्य देशांना टी20 क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दर्जा दिला होता. त्यानंतर आता जाहिर करण्यात आलेल्या महिलांच्या पहिल्या टी20 क्रमवारीमुळे महिलांना त्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात मदत होणार आहे.
या क्रमवारीत आॅस्ट्रेलिया पाठोपाठ न्यूझीलंड 277 गुणांसह दुसऱ्या आणि 276 गुणांसह इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच चौथ्या स्थानावर विंडिज असून त्यांना 259 गुण देण्यात आले आहेत. त्याचबरोबर भारताच्या खात्यात 249 गुण आहेत.
पूर्वी महिलांची एकत्रित क्रमवारी जाहिर केली जात होती. परंतू आता त्यांचीही पुरुषांच्या क्रमवारी प्रमाणे वनडे आणि टी20 ची वेगवेगळी क्रमवारी जाहिर केली जाईल.
महत्वाच्या बातम्या-
- वानखेडे ऐवजी या मैदानावर होणार भारत विरुद्ध विंडिज चौथा वनडे सामना
- वेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी
- आर अश्विनने केला मोठा पराक्रम; अनिल कुंबळेलाही टाकले मागे