---Advertisement---

एकच नंबर..! आपल्या पुण्यात होणार वर्ल्डकपचे 5 सामने, जाणून घ्या गहुंजेवर होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक

On: मंगळवार, जून 27, 2023 1:07 PM
Indian-Cricket-Team
---Advertisement---

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार वर्ल्डकपचे एकूण पाच सामने हे आपल्या महाराष्ट्रातील पुणे शहराजवळ असणाऱ्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहेत. यासह महाराष्ट्रातील मुंबईतील वानखेडे मैदानावर देखील वर्ल्डकपचे अनेक सामने होणार आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे दोन ठिकाणी वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. ( The ICC Men’s Cricket World Cup 2023 schedule is out now )

आयसीसी वनडे विश्वचषकाचे पुण्यात होणारे सामने

भारत विरुद्ध बांगलादेश – 19 ऑक्टोबर
अफगाणिस्तान विरुद्ध क्वॉलीफायर 3 – 30 ऑक्टोबर
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 1 नोव्हेंबर
इंग्लंड विरुद्ध क्वॉलीफायर 1 – 8 नोव्हेंबर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – 12 नोव्हेंबर

भारतात यंदा आयसीसी वनडे विश्वचषकाचे सर्व सामने होणार आहेत. या विश्वचषकासाठी वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) करण्यात आली. विश्वचषकाचा उद्घाटनाचा सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तर, अंतिम सामना देखील याच मैदानावर 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. ( ICC Mens Cricket World Cup 2023 schedule is out Matches will be held at Pune Gahunje ground )

अधिक वाचा –
– BREAKING: वर्ल्डकपचे काउंटडाऊन सुरू! वेळापत्रक झाले जाहीर, अहमदाबादमध्ये होणार उद्घाटनाचा सामना
– होल्डरला सुपर ओव्हरमध्ये 30 रन्स चोपणारा वॅन बीक! भारतीय म्हणाले, ‘लवकर आयपीएलमध्ये ये’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---