---Advertisement---

टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर; स्मिथ-फिंचचे पुनरागमन तर, ‘हा’ नवा शिलेदारही सहभागी

On: गुरूवार, ऑगस्ट 19, 2021 9:33 AM
---Advertisement---

येत्या काही महिन्यात आयसीसीच्या टी२० विश्वचषक २०२१ चा रोमांच सुरू होणार आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेट संघ या मोठ्या स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. अशात बलाढ्य क्रिकेट संघांमध्ये गणना होणाऱ्या ऑस्ट्रेलिया क्रिकेटने गुरुवारी (१९ ऑगस्ट) टी२० विश्वचषकासाठी त्यांचा १५ सदस्यीय संघ घोषित केला आहे. मात्र त्यांच्या एका निवडीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. १७ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषक सुरू होणार आहे.

या संघात नवखा यष्टीरक्षक फलंदाज जोश इंगलिस याला निवडण्यात आले आहे, जो टी२० विश्वचषकाद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करू शकतो. देशांतर्गत टी२० स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या मांदियाळीत त्याचे नाव असल्याने बोर्डाने त्याला संधी दिली आहे. त्याने नुकत्याच लीसेस्टरशायर या देशांतर्गत संघाकडून १४ सामन्यात १७५.८२ च्या स्ट्राईक रेटने ५३१ धावा चोपल्या आहेत.

तसेच वरिष्ठ शिलेदार स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांचे संघात पुनरागमन झाले आहे. फिंच त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला असून तो टी२० विश्वचषकात संघाचे नेतृत्त्वपद सांभाळेत. कमिन्स या संघाचा उपकर्णधार असेल. याबरोबरच स्मिथसुद्धा त्याच्या कोपराच्या दुखापतीतून बरा झाला असून टी२० विश्वचषकात प्रतिस्पर्धींना काट्याची टक्कर देताना दिसेल. केन रिचर्ड्सन, मार्कस स्टॉयनिस यांनाही पुनरागमनाची संधी मिळाली आहे.

टी२० विश्वचषक संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमानमध्ये होणार असल्याने गोलंदाजी विभागात ४ फिरकीपटूंना जागा देण्यात आली आहे. यामध्ये मिशेल स्वेप्सन, एश्टर एगर, ऍडम झम्पा आणि फिरकी अष्टपैलू मॅक्सवेलचा समावेश आहे. तर गोलंदाजी विभागात केन रिचर्डसन आणि जोश हेजलवुड यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

टी२० विश्वचषकासाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ
आरोन फिंच (कर्णधार), एश्टन एगर, पॅट कमिन्स (उपकर्णधार), जोश हेजलवूड, जोश इंगलिश, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मिशेल स्विप्सन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार का फिंच आणि स्मिथ? ऑसी कर्णधाराने दिले दुखापतीबद्दल अपडेट

लॉर्ड्सवरील विजयानंतर विरुष्काचा लंडनमध्ये ‘वेजिटेरियन लंच’; एका व्यक्तीला सर्वांनी केले खूप मिस

टी२० विश्वचषकासाठी हार्दिक पंड्याचे स्थान धोक्यात, ‘हे’ ३ खेळाडू करू शकतात पत्ता कट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---