---Advertisement---

पाकिस्तानच्या बॉयकॉटबाबत भारताचा हेड कोच गंभीरची रिऍक्शन व्हायरल, VIDEO पाहाच

On: बुधवार, फेब्रुवारी 4, 2026 10:08 AM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहता येणार नाही. त्याला कारणीभूत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि त्यांचे सरकार आहे. पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असताना आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना) मात्र त्यावर अजूनही काही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. या सामन्याबाबत भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला विचारले असता त्याने दिलेली रिऍक्शन खूपच व्हायरल झाली आहे.

स्पर्धा सुरू होण्याआधी भारत सराव सामना खेळणार आहे. यासाठी ते मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी विमानतळावर पोहोचले. हा सामना ४ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. यासाठी भारताचा प्रशिक्षक विभाग मुंबईला निघाले असता काही पत्रकारांनी गंभीरला पाकिस्तान सामन्याबाबत विचारले असता त्याने काहीही उत्तर न देता धन्यवाद म्हणत निघून गेला.

या व्हिडिओमध्ये अनेक पत्रकारांनी गंभीरला पाकिस्तानने सामन्यावर बहिष्कार टाकल्याचे विचारले. तेव्हा त्याने उत्तर देणे टाळले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच आयसीसीच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे.

गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दुसरा आयसीसी चषक जिंकण्यास आतूर आहे. याआधी त्याच्या प्रशिक्षणाखाली भारताने २०२५ आयसीसी चॅम्पियन्सचे विजेतेपद जिंकले आहे. त्यातील अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केले होते.

सध्या घरच्या मैदानावर भारतीय टी२० संघ चांगलीच कामगिरी करत आहे. नुकतेच त्यांनी न्यूझीलंडला टी२० मालिकेत ४-१ असे पराभूत केले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघाने मागील काही टी२० मालिकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. आहे. यामुळे गतविजेत्या भारतीय संघाकडून पुन्हा एकदा विजेतेपदाची आशा आहे.

भारताने २०२४मध्ये खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले होते. त्यामध्ये सूर्यकुमार संघसहकारी होता, आता तो कर्णधार म्हणून चषक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे.

पाकिस्ताननेही घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिका खेळली आहे. त्यामध्ये त्यांनी सलमान आगाच्या नेतृत्वाखाली खेळत ३-० अशा विजय मिळवत श्रीलंकेला रवाणा झाले आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांच्या टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील कामगिरी पाहिली तर भारतच वरचढ ठरला आहे. या दोन्ही संघ आतापर्यंत खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकांमध्ये आठ वेळा समोरा-समोर आले आहे. त्यातील ७ सामने भारताने जिंकले असून पाकिस्तानने एकाच सामन्यात विजय मिळवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---