---Advertisement---

अरेरे, काय ही अवस्था! श्रीलंकेत पाकिस्तान संघाचे विचित्र स्वागत? व्हिडिओ होतोय व्हायरल

On: मंगळवार, फेब्रुवारी 10, 2026 10:57 AM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पाकिस्तान या स्पर्धेत आपले सर्व गटातील सामने श्रीलंकेत खेळत आहे. पाकिस्तान क्रिकेट अनेक कारणानी चर्चेत असतो आता त्यांच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.

या व्हिडिओमध्ये पाकिस्तान संघाची बस एका ठिकाणी थांबली असून त्याच्या आसपासचा परिसर पाहता ही जागा आंतरराष्ट्रीय स्तरावरची वाटत नाही. यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचे श्रीलंकेने केलेल्या आदरातिथ्याची मस्करी उडवली जात आहे. यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दिसत असून त्यामागे काही पाकिस्तानी खेळाडू आणि स्टाफ आहेत. चाहत्यांनी याचा आनंद घेतला असून काहींनी हे पाकिस्तानसाठी अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला हे अजून समोर आलेले नाही.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला. आता त्यांचे या स्पर्धेतील पहिल्या सामन्याच्या कामगिरीवरून ते पुन्हा चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. पहिल्याच सामन्यात त्यांना नेदरलॅंड्सने चांगलीच टक्कर दिली.

नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या पाकिस्तानने नेदरलॅंड्सला १४७ धावसंख्येवर रोखले तर खरे मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या त्या सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचा हिरो फहीम अशरफ ठरला. त्याने जर १९व्या षटकात चौकार-षटकार मारले नसते किंवा नेदरलॅंड्सने त्याचा झेल सोडला नसता तर सामन्याचा निकाल काही वेगळाच असता.

पाकिस्तानने हा सामना ३ चेंडू आणि ३ विकेट्स शिल्लक राखत जिंकला. त्यांच्या या प्रदर्शनावरून पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंंनी नाराजी दर्शवली. तसेच या सामन्यात बाबर आझम १८ चेंडूत १५ धावा करत बाद झाला. त्याला संघात का घेतले, असे प्रश्नही विचारले गेले.

या स्पर्धेत पाकिस्तानने १५ फेब्रुवारीला भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठीही आपली भुमिका बदलली आहे. त्यांनी बांग्लादेशचे समर्थन करण्यासाठी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. आयसीसी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता त्यांनी निर्णय बदलला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---