---Advertisement---

संजूसाठी टी20 वर्ल्डकप 2026 सुरू होण्याआधीच संपला, कॅप्टन सूर्याने केलं स्पष्ट!

On: गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026 1:08 PM
---Advertisement---

भारताच्या टी२० विश्वचषक २०२४चा भाग असणारा संजू सॅमसन याचे पुन्हा एकदा टी२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार की काय, अशी लक्षणे दिसत आहेत. तो भारताच्या आगामी टी२० विश्वचषकाच्या संघात असून त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वॉर्म-अप सामन्यात मात्र अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही. याची स्पष्टता कर्णधार सूर्यकुमार यादवनेच दिली आहे.

बुधवारी (४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सराव सामना खेळला गेला. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताकडून फलंदाजीसाठी नवी जोडी उतरली. अभिषेक शर्मासह ईशान किशन सलामीला आला. तसेच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या टी२० सामन्यातही ईशाननेच विकेटकीपिंग केली. यामुळे संजू पुन्हा बाकावर की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सराव सामन्यावेळी सूर्यकुमारने नाणेफेकीनंतर त्यांच्या सलामीमध्ये बदल झाल्याचे सांगितले. त्याने अभिषेक आणि ईशान सलामीला येणार असे म्हणताच संजूला पुन्हा बॅकफूटवर जावे लागेल, असे दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याची फलंदाजीतील कामगिरी निराशाजनक राहिली. त्याआधी भारताचा संघ जाहीर झाला असता संजू टी२० विश्वचषक आणि त्या मालिकेसाठी मुख्य विकेटकीपर-सलामीवीर होता, आता मात्र त्याच्यावर बॅकअप विकेटकीपर-सलामीवीर होण्याची वेळ आली आहे.

संजूची कामगिरीच यामागचे कारण आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध पाचही टी२० सामने खेळले होते. यामध्ये त्याने केवळ ४६ धावा केल्या होत्या. दुसरीकडे ईशानने शतकी खेळी करत तो उत्तम फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले.

एशिया कप २०२५आधी अभिषेकसोबत संजूच समालीला येत होता. त्या दोघांनी काही उत्तम भागीदारीही केल्या. त्यानंतर त्याला बांग्लादेशविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संघातून बाहेर केले गेले, मग त्याने शतकी खेळी करत संघात जागा मिळवली. एशिया कपमध्ये त्याला मधल्या फळीत फलंदाजी करावी लागली. त्यानंतर मात्र पुन्हा त्याला संघातून डालवले गेले.

शुबमन गिलचा फॉर्म गेल्याने संजूला पुन्हा एकदा संधी मिळाली. नंतर त्याची टी२० विश्वचषक २०२६साठी निवड झाली.
तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी ईशान संघात तिलक वर्माच्या जागी आला. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत अनेक स्फोटक खेळी खेळल्या. विश्वचषकाच्या सराव सामन्यातही तोच सलामीला आल्याने संजूच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सराव सामन्यात भारतासाठी अभिषेक-ईशान जोडी आली असता टी२० विश्वचषकातही तेच दोघे सलामीला येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या संजूला तेव्हाच जागा मिळेल जेव्हा या दोघांपैकी कोणी जखमी होईल. कारण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तिलक पूर्णपणे फिट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---