---Advertisement---

T20 WC26: पाकिस्तानसाठी खेळला होता वर्ल्डकप, आता त्यांच्याविरुद्ध यूएसएसोबत देणार टक्कर

On: मंगळवार, फेब्रुवारी 10, 2026 9:36 AM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत आतापर्यंत जवळपास सर्व संघांनी एक-एक सामना खेळला आहे. त्यामध्ये अनेक असोसिएट संघांच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत ते काही साधी छोटी टीम नाहीतर विश्वचषकासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सिद्ध केले आहेत. यातील काही संघातील खेळाडू ज्यांनी मागील काळात दुसऱ्याच देशासाठी विश्वचषक स्पर्धा खेळला, ते या हंगामात त्याच देशाविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.

भारत-श्रीलंकामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत यूएसएचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. या सामन्यासाठी यूएसएच्या संघात नव्या खेळाडूची एंट्री झाली आहे. त्यात विशेष म्हणजे त्या खेळाडूने पाकिस्तानसाठी विश्वचषक खेळला आहे. यूएसएच्या संघात भारतीय वंशाच्या जसदीप सिंगच्या जागी एहसान आदीलला संघात घेतले आहे. तो अंतिम अकराचा भागही असणार आहे.

आदीलने पाकिस्तानचे वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्याने पाकिस्तानकडून २०१५चा आयसीसी वनडे विश्वचषकही खेळला आहे. यामध्ये पाकिस्तानचे नेतृत्व मिसबाद उल हकने केले होते. त्या स्पर्धेत आदीलने २ सामन्यात खेळताना २ विकेट्स घेतल्या होत्या.

वेगवान गोलंदाज आदीलने पाकिस्तानसाठी ३ कसोटी आणि ६ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण ९ विकेट्स घेतल्या. त्याने यूएसएसाठी अजून आंतरराष्ट्रीय पदार्पण नाही केले, मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

आता ११ वर्षानंतर आदील पाकिस्तानसोबत नाहीतर पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. जसदीपला खांद्याची दुखापत झाल्याने तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याला ही दुखापत सराव सामन्यात झाली होती. तसेच आदील पहिल्यापासूनच संघात ट्रॅव्हलिंग रिजर्व म्हणून होता.

पाकिस्तान विरुद्ध यूएसए सामना आज (मंगळवार, १० फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. माहित असावे असे की यूएसएने मागील टी२० विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केले होते. तो त्यांचा पहिलाच टी२० विश्वचषक होता. सुपर ओव्हरमध्ये गेलेला तो सामना यूएसएने ५ धावांनी जिंकला होता.

आताही यूएसएने आम्ही मोठ्या संघांना टक्कर देण्यास तयार आहोत, हे भारताविरुद्धच्या सामन्यातून प्रेक्षकांना दिसलेच आहे. तसेच या आवृत्तीत पाकिस्तानने कसाबसा त्यांचा पहिला सामना जिंकला, नाहीतर त्यांना नेदरलॅंड्सनेही पराभूत केले असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---