सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ऍशेस मालिका खेळली जात आहे. तसेच भारत आणि दक्षिण अफ्रिकेतही कसोटी मालिका सुरू आहे. यादरम्यान अनेक खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीमध्ये (icctest ranking) काही फेरबदल पाहायला मिळाले. आयसीसीने बुधवारी (१२ जानेवारी) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ कसोटी फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच कसोटी गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा कायल जेमिसनला मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे. जेमिसन कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावार पोहोचला आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीमधील पहिले पाच फलंदाज –
आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटला मागे टाकले होते. लाबुशेनकडे ९२४ गुण आहेत, जी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गुणसंख्या आहे. जो रुट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याच्याकडे ८८१ गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर स्मिथने स्थान बनवले आहे. स्मिथकडे ८७१ गुण आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनकडे ८६२ गुण आहेत आणि क्रमवारीत तो खाली घसरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. भारताचा दिग्गज रोहित शर्मा ७८१ गुणांसह पाचव्या क्रमांकावर कायम आहे.
🔼 Steve Smith overtakes Kane Williamson
🔼 Kyle Jamieson launches into third spotThe latest @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings 👇
Full list: https://t.co/0D6kbTluOW pic.twitter.com/vXD07fPoES
— ICC (@ICC) January 12, 2022
आयसीसी कसोटी क्रमवारीतील पहिले पाच गोलंदाज –
कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीचा विचार केला, तर यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर कायम आहे. कमिन्सकडे ८९४ गुण आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आहे, ज्याच्याकडे ८६१ गुण आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदीला यावेळी नुकसान झाले आहे. गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कायल जेमिसनने स्थान बनवले आहे. जेमिसनकडे ८२५ गुण आहेत. शाहीन अफ्रिदी चौथ्या क्रमांकावर घसरला आहे आणि त्याच्याकडे ८२२ गुण आहेत. दक्षिण अफ्रिकेचा कगिसो रबाडा ८१० या यादीत पाचव्या क्रमांकावर आला आहे. त्याने दिग्गज जेम्स अँडरसनला मागे टाकले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! भारताच्या वनडे संघात दोन बदल, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूची निवड
बांगलादेशच्या फलंदाजाला शिवीगाळ करणं जेमिसनला पडलं भलतंच महागात! आयसीसीकडून मोठी कारवाई
व्हिडिओ पाहा –