15 जून, शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) 2018-2019 या मोसमासाठी आयसीसीच्या पंचांची आणि मॅच रेफरींच्या एलीट पॅनलची घोषणा केली आहे.
या पंचांच्या एलीट पॅनलमध्ये भारतीय पंच सुंदरम रवी यांचीही निवड झाली आहे. त्यांनी आतंरराष्ट्रीय पंच म्हणून 29 आॅक्टोबर 2011 मध्ये सुरवात केली. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील टी 20 सामन्यात आंतरराष्ट्रीय पंच म्हणून पहिल्यांदा काम केले.
रवी यांनी एकूण 33 वनडे, 26 कसोटी आणि 18 टी20 सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे.
या पॅनेलचा कालावधी 1 जुलै 2018 ते 30 जून 2019 पर्यंत असेल. या पॅनलची घोषणा निवड प्रक्रियेनुसार आणि वार्षिक कामगिरी नुसार करण्यात आली आहे.
आयसीसी पंचांच्या निवड समितीमध्ये अध्यक्ष व आयसीसी महाव्यवस्थापक यांचा समावेश होता. यात जेफ ऍलॉर्डिस, आयसीसीचे मुख्य मॅच रेफरी रंजन मदुगले, इंग्लंडचे माजी खेळाडू आणि समालोचक डेविड लॉइड आणि भारताचे माजी कर्णधार आणि आतंरराष्ट्रीय पंच श्रीनिवास वेंकटराघवन यांचा समावेश आहे.
या समितीने अलीम दार, कुमार धर्मसेना, मॅरेस एरामस, क्रिस गॅफनी, इयान गोल्ड, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, निगेल लाँग, ब्रूस ऑक्सेनफोर्ड, सुंदरम रवी, पॉल रायफल आणि रॉड टकर या पंचाची एलीट पॅनलमध्ये निवड केली आहे.
मागील वर्षीही आयसीसीचे हेच पंचांचे एलीट पॅनल होते. यात कोणताही बदल झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–टी-20 चा सुपरहीरो कसोटीमध्ये ठरला झीरो!
–माझ्या शतकामागे रशिद खानचा हात- शिखर धवन
–तब्बल 57 वर्षानंतर जुळून आला भारतीय क्रिकेटमध्ये हा योगायोग






