Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी20 विश्वचषकाच्या धामधुमीत किंग कोहली ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’, महिलांमध्ये ‘ही’ ठरली विजेती

टी20 विश्वचषकाच्या धामधुमीत किंग कोहली 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ', महिलांमध्ये ‘ही’ ठरली विजेती

November 7, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, खेळाडू, टॉप बातम्या
Virat-Kohli

Photo Courtesy: Twitter/ICC


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसीने मागील वर्षीपासून ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार प्रदान करायला सुरुवात केली. दर महिन्याला त्या-त्या महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या एका पुरुष आणि एका महिला क्रिकेटपटूला हा पुरस्कार दिला जातो. त्याच अंतर्गत नुकतेच ऑक्टोबर महिन्याच्या पुरस्काराच्या पुरूष नामांकनामध्ये विराट कोहली, डेविड मिलर आणि सिंकदर रझा यांचा समावेश होता. त्यामधून निवड करणे अवघड असे वाटत असताना विराटने त्याच्या कामगिरीमुळे ते सोपे केले.

भारताचा स्फोटक आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला आयसीसीने ऑक्टोबर महिन्याचा सर्वोत्कृष्ट पुरूष खेळाडू हा पुरस्कार दिला आहे. तसेच महिलांमध्ये हा पुरस्कार पाकिस्तानची अष्टपैलू निदा दार (Nida Dar) हिने पटकावला आहे.  विशेष म्हणजे विराटला या पुरस्कारासाठी प्रथमच नामांकित करण्यात आले होते. त्याने पहिल्याच प्रयत्नात हा पुरस्कार जिंकला असून तो पण टी20 विश्वचषक सुरू असताना.

तसेच विराट हा पुरस्कार जिंकणारा भारताचा पाचवा पुरूष क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी रिषभ पंत, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि श्रेयस अय्यर यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.

आयसीसी पुरस्कारांमध्ये विराटचा षटकार
क्रिकेटमधील विक्रम असो वा आयसीसी पुरस्कार, विराटने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तो जेव्हा जेव्हा एका सामन्यात धावांचा पाऊस पाडतो तेव्हा तेव्हा 4-5 विक्रम तरी मोडतो किंवा आपल्या नावे करतो. आयसीसी पुरस्कारामध्येही त्याने असेच काहीसे केले आहे. त्याने आतापर्यंत सहा आयसीसीचे वेगवेगळे पुरस्कार जिंकले आहेत. त्यामध्ये आयसीसी दशकाचा सर्वोत्तम खेळाडू, आयसीसी वनडे क्रिकेटमधील दशकाचा सर्वोत्तम खेळाडू, आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर, आयसीसी वनडे प्लेयर ऑफ द इयर, आयसीसी सर्वोत्तम कसोटीपटू आणि ऑक्टोबर महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर विराटने आतापर्यंत 10 निरनिराळे आयसीसीचे पुरस्कार जिंकले आहे. सर्वाधिक आयसीसी पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा कुमार संगकारा, भारताचा यशस्वी कर्णधार एमएस धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हे संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. या तिघांनीही प्रत्येकी 4 आयसीसी पुरस्कार जिंकले आहेत.

Congratulations to @imVkohli – ICC Player of the Month for October 👏👏#TeamIndia pic.twitter.com/IEnlciVt9T

— BCCI (@BCCI) November 7, 2022

‘असे होते’ विराटचे प्रदर्शन
विराटने टी20 विश्वचषक सुरू असताना हा पुरस्कार पटकावला हे विशेष आहे. त्याने या स्पर्धेत पाच सामन्यांच्या पाच डावांमध्ये खेळताना सर्वाधिक अशा 246 धावा केल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामनाविजयी नाबाद 82 धावांचा समावेश आहे. ही खेळी त्याने जेव्हा भारत 31 धावसंख्येवर 4 विकेट्स गमावून बसला तेव्हा 53 चेंडूमध्ये केली.

विराटने गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 28 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात नेदलॅंड्सविरुद्ध 44 चेंडूमध्ये नाबाद 62 धावा केल्या. तसेच त्याने बांगलादेशविरुद्धही 44 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या.

महिला क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानने मारली बाजी
पाकिस्तानच्या निदा दार हिने भारताचे जेमीमा रोड्रिग्ज आणि दीप्ति शर्मा यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. निदाने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या महिलांच्या आशिया चषकात 6 सामन्यात 145 धावा केल्या त्याचबरोबर 8 विकेट्सही घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! रे*प केसचा आरोपी धनुष्का गुणतिलकाची श्रीलंका संघातून हकालपट्टी, जामीनही नाही मिळाला
कतारचा फिफा वर्ल्डकप की मृत्यूची खाण! बुंदेसलिगाच्या सामन्यात झळकले “बॉयकॉट कतार 2022” चे बॅनर्स


Next Post
ricky-ponting

रिकी पॉंटिंगची भविष्यवाणी! म्हणाला 'हा' बनू शकतो ऑस्ट्रेलियाचा पुढचा कर्णधार

England

भारतासाठी आनंदाची बातमी, इंग्लंडचा 'हा' स्फोटक खेळाडू मुकणार सेमीफायनलला!

mc square virat kohli

रॅपर एमसी स्क्वेअरचे विराट कोहलीकडून कौतुक, म्हणाला, 'हे गाणे कमीत कमी 100 वेळा ऐकले'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143