मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअमवर पुन्हा एकदा भारत विरुद्ध श्रीलंका सामना रंगणार आहे. विश्वचषक 2011 स्पर्धेच्या अंतिम सामना आठवत असेल, तर याच मैदानावर उभय संघ भिडले होते. या सामन्यात भारताने विजय मिळवत तब्बल 28 वर्षांनंतर एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाचा किताब आपल्या नावावर केला होता. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ या सामन्यात भिडणार आहेत. चला तर, सामन्याविषयी सर्वकाही जाणून घेऊयात…
भारतीय संघासाठी या स्पर्धेतील आतापर्यंतचा प्रवास शानदार राहिला आहे. भारताने आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यात विजय मिळवला आहे. तसेच, श्रीलंका संघाने 6 सामने खेळले असून त्यांना 4 सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. तसेच, 2 सामन्यात फक्त विजय मिळवता आला आहे. अशात त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा खूपच कमी दिसत आहेत.
विश्वचषक (World Cup) स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत अनेक सामने खेळले गेले आहेत. मात्र, आतापर्यंतचा आमना-सामना बरोबरीचा राहिला आहे. दोन्ही संघ विश्वचषकात एकूण 9 सामन्यात भिडले आहेत. यामध्ये 4 वेळा भारत आणि 4 वेळा श्रीलंका संघाला विजय मिळाला आहे. तसेच, एक सामना अनिर्णित राहिला आहे. वनडे क्रिकेटबाबत बोलायचं झालं, तर यात भारताचे पारडे जड आहे. 167 सामन्यात भारताने 98 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेला 57 सामने जिंकण्यात यश आले आहे.
वानखेडेची खेळपट्टी
वानखेडे मैदानाच्या खेळपट्टीवर नेहमीच फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. येथील लाल मातीवर फिरकी गोलंदाजांनाही भरपूर मदत मिळते. मात्र, या मैदानावर मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो. पहिल्या दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 380पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला होता.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील 33वा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरू होईल. नाणेफेकीची वेळ 1.30 वाजता आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. तसेच, सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिझ्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. (icc odi world cup 2023 ind vs sl 33rd match preview predicted eleven and live stream read here)
संभावित प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
श्रीलंका
कुसल मेंडिस (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, दुष्मंथ चमीरा, महीश तीक्षणा, कसून रजिता, दिलशान मधुशंका
हेही वाचा-
लाजीरवाण्या पराभवानंतर खचला टॉम लॅथम; म्हणाला, ‘हे आमचे सर्वोत्तम प्रदर्शन नाही, आम्ही जर त्यांना…’
ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के! ‘या’ विस्फोटक खेळाडूने सोडला भारत, ऑस्ट्रेलियाला रात्रीच रवाना, पण का?