नुकताच न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक पार पडला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने इतिहासातील त्यांची ७ वी विश्वचषक ट्रॉफी जिंकली. रविवारी (३ एप्रिल) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना खेळला आणि ७१ धावांनी जिंकला देखील. विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३५७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८५ धावांवर गुंडाळला गेला. या सामन्यानंतर आयसीसीने स्पर्धेत सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे.
आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (ICC Women’s World Cup 2022) मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या या ११ खेळाडूंच्या संघात एकही भारतीय खेळाडू सहभागी नाहीय, ही गोष्ट विशेष म्हणावी लागेल. भारतीय संघाने या विश्वचषकात खेळलेल्या साखळी फेरीच्या ७ सामन्यांपैकी ३ जिंकले आणि ४ मध्ये संघ पराभूत झाला. या सुमार प्रदर्शनामुळे संघ पहिल्या चार संघातही पोहोचू शकला नाही. आता आसीसीने जाहीर केकेल्या सर्वोत्तम ११ खेळाडूंच्या संघात ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक ४ खेळाडूंना संधी मिळाली आहे. दक्षिण अफ्रिकेच्या ३, इंग्लंडच्या २, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज यांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश या संघात आहे.
हा ११ खेळाडूंचा संघ महिला विश्वचषकात सहभागी असलेले समालोचक, पत्रकार आणि आयसीसीच्या सदस्यांनी निवडला आहे. या संघाचे नेतृत्व विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगकडे दिले गेले आहे. सलामीसाठी दक्षिण अफ्रिकेची लॉरा वोलवार्ट आणि विश्वविजेती एलीसा हीली यांना निवडले गेले आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार मेग लेनिंग आणि चौथ्या क्रमांकावर विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी रेचेल हेंसला (५०९ धावा) निवडले गेले आहे.
🇦🇺 4
🇿🇦 3
🏴 2
🇧🇩 1
🌴 1The @upstox Most Valuable Team of the Tournament is revealed! #CWC22
Find out who made the cut ⬇️
— ICC (@ICC) April 4, 2022
पाच, सहा आणि सात या क्रमाकावर अनुक्रमे नॅट स्कीवर, बेथ मूनी आणि हेली मॅथ्यूज यांच्या अष्टपैलूच्या भूमिकेत निवडले गेले आहे. गोलंदाजीत दक्षिण अफ्रिकेची मारिजान कॅप, शबनिम इस्माइल, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन आणि बांगलादेशची सलमा खातून यांनी अप्रतिम प्रदर्शन केले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांना या संघात संधी दिली गेली आहे.
आयसीसीने विडलेली महिला विश्वचषकातील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन – लॉरा वोलवार्ट, एलिसा हीली, मेग लैनिंग (कर्णधार), रैचेल हेंस, नैट स्कीवर, बेथ मूनी, हैली मैथ्यूस, मरिजान कैप, सोफी एक्लेस्टोन, शबनिम इस्माइल, सलमा खातून.
महत्वाच्या बातम्या –
कोण आहे जीतेश शर्मा? ज्याने आयपीएल पदार्पणात स्टार क्रिकेटर धोनीला बाद करण्यात दिले योगदान
नाणेफेकीचा कौल हैदराबादच्या पारड्यात, लखनऊच्या ताफ्यात धाकड अष्टपैलूचे पुनरागमन; पाहा प्लेइंग XI
‘भाई ३डी चष्मा घातलेला का?’, लिविंगस्टोनचा सोपा झेल सोडलेला अंबाती रायुडू ट्रोलर्सच्या निशाण्यावर