आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यावर्षाच्या सुरुवातीपासून महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी पुरस्कार सुरु होता होता. त्यानुसार जुलै २०२१ मधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी खेळाडूंची नामांकने जाहीर करण्यात आली आहे.
महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठी बांगलादेशचा शाकिब अल हसन, ऑस्ट्रेलियाचा मिशेल मार्श आणि वेस्ट इंडिजचा हेडन वॉल्श जूनियर यांना नामांकन मिळाले आहे. तर, महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठी वेस्ट इंडिजच्या हेले मॅथ्यूज, पाकिस्तानच्या फातिमा सना आणि वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर यांना नामांकन मिळाले आहे.
गेल्या महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध बांगलादेशला मालिका जिंकण्यात शाकिबने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मार्शने विंडीजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी -२० मालिका खेळली. त्याने टी-२० मध्ये २१९ धावा केल्या आणि आठ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच लेगस्पिनर हेडनने गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले जेथे त्याने सात विकेट्स घेतल्या. टी -२० मालिकेतही त्याने पाच सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या.
हेलेने पाकिस्तान महिला संघाविरुद्ध शतक झळकावले आणि दोन विकेट्सही घेतल्या. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान तिला सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले. याच मालिकेदरम्यान फातिमा सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू होती. तर वेस्ट इंडिज महिला संघाची कर्णधार स्टेफनीने पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी -२० मालिकेत फलंदाजी आणि चेंडू दोन्हीच्या सहाय्याने संघाच्या विजयात योगदान दिले आहे.
जुलै महिन्यात भारतीय संघाने श्रीलंका दौरा केला होता. मात्र, या पुरस्कारासाठी एकाही भारतीय खेळाडूला नामांकन मिळालेले नाही.
अशा पद्धतीने दिले जातात पुरस्कार
या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येते. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येते.
आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतात.
व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करते. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतात. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना 90 टक्के तर चाहत्यांच्या मतांना 10 टक्के प्राधान्य असते. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
गेल्या २ वर्षांत भारतासाठी इंग्लंडमधील पाऊस ठरतोय त्रासदायक; गमावलेत ‘हे’ २ महत्त्वाचे सामने
‘पाऊस बनला खलनायक’, इंग्लंड-भारत कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर चाहते संतापले; दिल्या अशा प्रतिक्रिया
‘मोहम्मद सिराज आता भारताचा दुसऱ्या पसंतीचा गोलंदाज ठरत आहे’, ऑसी दिग्गजाने केले कौतुक