आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वतीने दर महिन्याला देण्यात येणारा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झाली आहेत. सप्टेंबर महिन्यासाठी पुरुष व महिला विभागात प्रत्येकी तीन खेळाडूंना नामांकने देण्यात आली. महिला गटात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मंधाना तर, पुरुष गटात अष्टपैलू अक्षर पटेल यांना नामांकने मिळाली आहेत.
Three outstanding performers 👏
The nominees for the ICC Men's Player of the Month for September 2022 📝
More on their exploits 👉 https://t.co/9X4h3AgeKX pic.twitter.com/r0vSXheQCN
— ICC (@ICC) October 5, 2022
आयसीसीने बुधवारी (5 ऑक्टोबर) सप्टेंबर महिन्याची नामांकने जाहीर केली. पुरुष गटात अक्षरसह ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन व यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांना नामांकन मिळाले आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करताना 9 बळी मिळवले होते. ग्रीन याने देखील याच मालिकेत दोन आक्रमक अर्धशतके झळकावली होती. तर रिझवानने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तसेच आशिया चषकात सातत्यपूर्ण फलंदाजी केली होती.
Three of Asia's finest superstars 🌟
The nominees for the ICC Women's Player of the Month for September 2022 have been in brilliant form 🔥
More 👉 https://t.co/5FzgHdZIck pic.twitter.com/VJtyCM4kgB
— ICC (@ICC) October 5, 2022
महिला गटात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मंधाना यांना नामांकन मिळाले. भारतीय महिला संघाने नुकताच इंग्लंडचा दौरा केला होता. टी20 मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागलेला. मात्र, वनडे मालिकेत विजय मिळवत 1999 प्रथमच मालिका नावावर केली. विशेष म्हणजे यावेळी संघाने इंग्लंडला व्हाईट वॉश दिला. स्मृतीने टी20 व वनडे मालिकेत प्रत्येकी एक अर्धशतक झळकावले होते. तर हरमनप्रीत कौरही वनडे मालिकेत मालिकावीर ठरली होती. तिने तीन सामन्यात 221 धावा चोपलेल्या. यामध्ये एक अर्धशतक व एका शतकाचा समावेश होता. स्मृती अथवा हरमनप्रीत हा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरल्या तर हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या खेळाडू बनतील. बांगलादेशची अनुभवी खेळाडू नेगर सुलताना हिला देखील या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने दाखवली किशोरदांच्या बंगल्यात बनवलेल्या रेस्टॉरंटची झलक, व्हिडिओ पाहिला का?
एकच मारला, पण कच्चून मारला! पंजाबच्या पठ्ठ्याने भिरकावला 108 मीटरचा गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडिओ