---Advertisement---

नोव्हेंबरच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन, एकाही भारतीयाचं मात्र नाव नाही

On: मंगळवार, डिसेंबर 7, 2021 8:03 PM
Virat-Kohli (Team India)
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गेल्या काही महिन्यांपासून महिभरातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूला महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार (ICC Player Of The Month) देण्यास सुरुवात केली आहे. दर महिन्याला एक पुरुष आणि एक महिला क्रिकेटपटू या पुरस्काराचा मानकरी ठरतो. मागील नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारासाठीही आयसीसीने ३ पुरुष आणि ३ महिला क्रिकेटपटूंची निवड केली आहे. परंतु यंदाच्या यादीत एकाही भारतीय क्रिकेटपटूचा समावेश नाहीये. 

नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघाने मायभूमीत न्यूझीलंडला ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत क्लिन स्वीप केले आहे. त्यानंतर कानपूर येथील अनिर्णित राहिलेला पहिला कसोटी सामनाही नोव्हेंबर महिन्यातच झाला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. अशा प्रदर्शनानंतरही आयसीसीने एकाही भारतीय पुरुष क्रिकेटपटूला नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या निवडीसाठी मानांकन दिलेले नाही.

पुरुष क्रिकेटपटूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर (David Warner), पाकिस्तानचा सलामीवीर आबिद अली (Abid Ali) आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउदी (Tim Southee) यांची निवड करण्यात आली आहे.

वॉर्नरला टी२० विश्वचषक २०२१ मधील प्रदर्शनाच्या जोरावर हे मानांकन मिळाले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला टी२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर साउदीने टी२० विश्वचषकानंतर भारताच्या दौऱ्यात दमदार गोलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच आबिद अलीने नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण करताना आपल्या पहिल्याच सामन्यात ५० च्या सरासरीने धावा कुटल्या होत्या आणि संघाला विजयही मिळवून दिला होता.

महिला क्रिकेटपटूंविषयी बोलायचे झाल्यास, बांगलादेशची नहिदा अख्तर, पाकिस्तानची अनम अमीन आणि वेस्ट इंडिजची हेले मॅथ्यूज यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

https://twitter.com/ICC/status/1468159621286223874?s=20

अशा पद्धतीने दिले जातात पुरस्कार 
या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येणार आहे. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येईल.

आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतील.

व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करेल. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतील. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना ९० टक्के तर चाहत्यांच्या मतांना १० टक्के प्राधान्य असेल. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्‍या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

यंदा इंग्लंडचा संघ करणार का ११ वर्षांपूर्वीच्या कारनाम्याची पुनरावृत्ती? नाहीतर रिकाम हात जावं लागणार घरी

‘विश्वविक्रमवीर’ एजाजचा मोठा खुलासा! ‘त्या’ निर्णयाने मिळाली आयुष्याला कलाटणी

फक्त फिल्डिंगला आला आणि ‘एक लाख’ जिंकून गेला! मुंबई कसोटीत घडली अनोखी घटना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---