---Advertisement---

आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा

On: गुरूवार, जून 17, 2021 7:14 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आता फक्त काही तास राहिले आहेत. पूर्ण क्रिकेट विश्वाला या सामन्याची आतुरता आहे. हा अंतिम सामना १८ जून ते २२ जूनदरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन हे दोघेही दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या बादफेरीत आमने- सामने असतील. २०१९च्या विश्वचषकच्या उपांत्य फेरीत हे दोन्ही संघ आमने- सामने होते, तेव्हा न्यूझीलंड संघाने भारताचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. विराट हा यावेळी मागील पराभवाचा बदला घेण्यास मैदानात उतरेल. विराट हा त्याच्या आक्रमक स्वभावामुळे ओळखला जातो. नेतृत्त्व करणं असो किंवा फलंदाजी विराट हा प्रत्येक वेळेस आक्रमक दृष्टीने खेळतो. आयसीसीने विराटचे काही फोटोज ट्विटरवर शेअर केले आहेत, त्यात त्याची आक्रमक शैली दिसून येत आहे. (Icc posts indian captain Virat Kohli aggressive photos)

ट्विटरवर नेटकऱ्यांनी उडवली विराटची थट्टा
विराटचे हे फोटोज व्हायरल होताच चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. चाहत्यांनी विराटच्या या आक्रमक शैलीला ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विराट करेल मोठा कारनामा
विराट कोहलीला आतापर्यंत कर्णधार म्हणून एकही आयसीसी चषक जिंकता आले नाही. यावेळी त्याला संधी आहे की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकून त्याच्या सर्व टीकाकारांचे तोंड बंद करू शकतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून विराट ही चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला कर्णधार बनू शकतो.

पहिली वहिली आयसीसी चषक जिंकण्याची संधी
विराटच्या नेतृत्त्वात आतापर्यंत भारताने ६० कसोटी सामने खेळले आहेत. त्यात ३६ सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे, तर १४ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच १० सामने हे अनिर्णित राहिले आहेत. विराटने वनडे क्रिकेटमध्ये ९५ सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात ६५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे, तर २७ सामन्यात पराभव झाला आहे. तसेच १ सामना बरोबरीत आणि २ सामने अनिर्णित राहिले आहेत. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाला २०१७ चा चॅम्पियन्स चषक आणि २०१९चा वनडे विश्वचषक स्पर्धे यश मिळवता आले नाही, परंतु जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून विराटकडे इतिहास रचण्याची संधी आहे.

माहेला जयवर्धनेचा विक्रम मोडण्याची संधी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराटला माहेला जयवर्धनेचा द्विशतकाचा विक्रम मोडण्याची संधी असेल. कसोटी क्रिकेटमध्ये माहेला जयवर्धनेच्या नावावर ७ द्विशतक आहे आणि विराट कोहलीच्या नावावरही ७ द्विशतक आहेत. जर विराटने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात द्विशतक ठोकले, तर या विक्रमात तो जयवर्धनेला मागे सोडेल.

महत्वाच्या बातम्या-

कशी झाली होती रितिकासोबत भेट अन् काय होती युवराजची धमकी? रोहित शर्माने केला उलगडा

अखेर अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी केला विवियन रिचर्ड्स यांच्याबरोबरच्या प्रेमकथेचा खराखुरा उलगडा

फिनिक्स भरारी! पहिल्या डावात केवळ १५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या संघाने तब्बल १५५ धावांनी मिळवला विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---