नुकतीच आयसीसीने सुधारित क्रमवारी जाहिर केली आहे. ही क्रमवारी जाहिर होण्याआधी नुकतीच भारत आणि इंग्लंड मालिका पूर्ण झाली होती. या मालिकेचा प्रभाव या क्रमवारीवर झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये भारताचा स्टार अष्टपैलू खेळलाडू हार्दिक पंड्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत थेट १३ स्थानांनी आघाडीवर येत आठव्या स्थानी विराजमान झाला आहे. मात्र, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीला मात्र तोटा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
नुकत्याच जाहिर झालेल्या क्रमवारीत बाबर आझमने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत बाबर आझमन पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर पाकिस्तानचा इमाम उल हक आणि दक्षिण आफ्रिकेचा रस्सी व्हॅन डर ड्यूसेन हे क्रमश: दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा चोथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. याआधी विराट कोहलली क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आणि रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर विराजमान होते. मात्र, दोघांनाही इंग्ललंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोघांनाही विशेष कामगिरी करण्यास अपयश आले त्यामुळले क्रमवारीत त्यांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
👑 New #1 ODI bowler
📈 Hardik Pandya climbs 13 spots
🔝 Babar Azam continues to lead the packThe latest @MRFWorldwide ICC Men's Player Rankings ⬇️https://t.co/xJaElScI0y
— ICC (@ICC) July 21, 2022
हार्दिक पंड्याची गरूडझेप
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू ह्रिदक पंड्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जोरदार प्रदर्शन करत मालिकावीर पुरस्कार मिळवलला. यामुळे त्याला आयसीसी क्रमवारीत देखील फायदा झाल्याचे दिसून आसे. मालिकेपूर्वी हार्दिक आयसीसी क्रमवारीत २१व्या स्थानी होता. आता त्याची क्रमवारी सुधारित झाली असून सध्या तो ८व्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघाचे आणि हार्दिक पंड्याचे चाहते खूश असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, गोलंदाजांच्या यादीत भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची देखील घसरण झाल्याचे दिसून आले होते. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली हती. त्याचा परिणाम त्याच्या क्रमवारीवर झाला आहे. त्याच्या जागी आता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ड जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज बनला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टीम इंडियाचा धोका वाढला, पाकिस्तान हळू हळू बनवतंय विश्वचषकात भक्कम जागा
Historic Win। काय तो धोनी, काय ते लॉर्ड्स चे ग्राऊंड अन् काय तो इशांत शर्मा, भारत ओक्के मंधी हाय!