---Advertisement---

ICC Rankings: टी20त इंग्लंडच्या पठ्ठ्याकडून सूर्याच्या जागेला धोका; वनडेत बाबरचा दबदबा, तर कसोटीत…

On: बुधवार, डिसेंबर 27, 2023 5:09 PM
Phil-Salt
---Advertisement---

ICC T20 Rankings: आयसीसीने बुधवारी (दि. 27 डिसेंबर) ताजी रँकिंग जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्ट याला जबरदस्त फायदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत सॉल्टने वादळी फलंदाजी केली होती. या मालिकेत त्याने सलग दोन सामन्यात दोन शतके झळकावली होती. त्यानंतर आता सॉल्ड टी20 क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम रँकिंगवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, सॉल्ट अलीकडेच पार पडलेल्या आयपीएल 2024 लिलावात अनसोल्ड राहिला होता.

फिल सॉल्टचा जलवा
फिल सॉल्ट (Phil Salt) 802 रेटिंगसह फलंदाजांच्या आयसीसी टी20 रँकिंगमध्ये (ICC Rankings) दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीतील अव्वलस्थान अजूनही भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडे आहे. 887 रेटिंगसह सूर्या फलंदाजांच्या टी20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान 787 रेटिंगसह तिसऱ्या स्थानी आहे.

https://twitter.com/ICC/status/1739922202781216788

वनडेत बाबर आझम पहिल्या स्थानी
फलंदाजांच्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम 824 रेटिंगसह यादीत अव्वलस्थानी आहे. त्यानंतर शुबमन गिल 801 रेटिंगसह यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या स्थानी आहेत. विराटची 768 आणि रोहितची 746 रेटिंग आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर यादीत पाचव्या स्थानी असून त्याची रेटिंग 745 आहे.

कसोटीत विलियम्सनची बादशाहत कायम
फलंदाजांच्या आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये (ICC Test Rankings) न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) पहिल्या स्थानी आहे. इंग्लंडचा जो रूट 859 रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, 826 रेटिंगसह स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या आणि उस्मान ख्वाजा 808 रेटिंगसह चौथ्या स्थानी आहे.

याव्यतिरिक्त गोलंदाजी रँकिंग पाहायची झाली, तर टी20त इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद 726 रेटिंगसह अव्वलस्थानी आहे. वनडेत दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज 716 रेटिंगसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. तसेच, कसोटीत भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) 879 रेटिंगसह पहिल्या स्थानी आहे. (icc rankings batter phil salt high rating suryakumar yadav icc t20 rankings number one know here)

हेही वाचा-
NZvsBAN: इतिहास घडला! बांगलादेशने बलाढ्य न्यूझीलंडला त्यांच्याच देशात लोळवत नोंदवला पहिला टी20 विजय
धावा करूनही राहुलवर प्रश्न उपस्थितीत होतात! माजी दिग्गजाचे विधान चर्चेत, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---