भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian Women’s Cricket Team) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन विश्वचषक स्पर्धेत जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली आहे. असे असले तरी त्यांची चॅम्पियन बनण्याची जिद्द कमी झाली नाही. तसेच संघाकडे आता पाच विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. येत्या चार वर्षात म्हणजे २०२३ ते २०२६ दरम्यान चार विश्वचषकाच्या स्पर्धा खेळल्या जाणार आहेत. आयसीसीने मंगळवारी (१६ ऑगस्ट) फ्यूचर टूर प्रोग्राम (एफटीपी) जाहीर केला आहे.
आयसीसीने प्रथमच एफटीपी अर्थातच भविष्यातील मोठ्या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. याआधी आयसीसी फक्त पुरूष क्रिकेट संघाचे एफटीपी कार्यक्रम जाहीर करत होते. आता त्यांनी महिलांच्या प्रमुख स्पर्धां जाहीर केल्या आहेत. भारत महिला संघ एप्रिल २०२५ पर्यंत आयसीसी विमन्स चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळणार आहेत. तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध परदेशी भुमीवर मालिका खेळणार आहेत.
भविष्यात महिला क्रिकेट ३००पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. ज्यामध्ये ७ कसोटी, १३५ वनडे आणि १५९ टी२० सामन्यांचा समावेश आहे. २०२५मध्ये भारत वनडे विश्वचषकाचे यजमानपद भुषविणार आहेत. एफटीपीमध्ये भारत एकूण ६५ सामने खेळणार आहे.
तसेच संघ २०२२-२५च्या आयसीसी विमन्स चॅम्पियनशीपच्या अंतर्गत ३ सामन्यांची द्विपक्षिय वनडे मालिका खेळणार आहेत. त्यानंतर २०२५चा वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे.
भारतीय महिला संघ सप्टेंबर महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघ तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर तेवढ्याच सामन्यांची टी२० मालिकाही खेळणार आहेत. या दौऱ्यातील पहिला टी२० सामना १० सप्टेंबरला खेळला जाणार आहे.
महिलांच्या आयसीसीमधील प्रमुख स्पर्धा
फेब्रुवारी २०२३ – महिला टी२० विश्वचषक, दक्षिण आफ्रिका
सप्टेंबर/ऑक्टोबर २०२४ – महिला टी२० विश्वचषक, बांगलादेश
सप्टेंबर/ऑक्टोबर २०२५ – महिला क्रिकेट वनडे विश्वचषक, भारत
जून २०२६ – महिला टी२० विश्वचषक, इंग्लंड
फेब्रुवारी २०२७ – महिला टी२० चॅम्पियन्स ट्रॉफी, श्रीलंका
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शाहीनच्या अनुपस्थितीत कसा असेल पाकिस्तानी संघ? वाचा पहिल्या सामन्यासाठीची संभाव्य प्लेइंग११
कार्तिकचे शार्दुलबद्दल बडेबोल; म्हणाला, ‘जर त्याच्यात कोणत्या गोष्टीची कमी नव्हती, तर…’
आता पुन्हा भारतीय प्रेक्षकांमध्ये जागणार उत्साह! ऑस्ट्रेलिया सह न्यूझीलंडही येणार भारताच्या दौऱ्यावर