कोणताही क्रिकेट सामना पाहण्याची खरी मजा येते ती प्रत्यक्षात स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यातच. हजारो-लाखोंच्या संख्येने गजबजलेले स्टेडियम, खेळाडूंच्या षटकारानंतर चेंडू पकडण्यासाठी प्रेक्षकांची धडपड, आपल्या संघातील खेळाडूंच्या चांगल्या प्रदर्शनानंतर चाहत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद या सर्व गोष्टी क्रिकेटपटूंचाही उत्साह वाढतात. मात्र कोविड-१९ महामारीमुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांविना क्रिकेट सामने खेळवले जात आहेत.
जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. परंतु आता कोविड-१९ चा प्रसार कमी झाल्याचे पाहून ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या क्रिकेट सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या बिग बॅश लीग १०च्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आल्यामुळे हजारोंच्या संख्येने चाहते सामन्यांचा आनंद लुटताना दिसले. दरम्यान कॅमेरामनने सामना पाहायला आलेल्या युवा वर्गाचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने (आयसीसीने) अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे चिमुकल्या चाहत्यांचे फोटो शेअर करत भन्नाट कॅप्शन दिले आहे. ‘स्टँडमध्ये युवा चाहत्यांचा हसरा चेहरा हा आमच्या आवडत्या नजाऱ्यांपैकी एक आहे,’ असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या फोटोंमध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या अनेक लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे.
🏏😄
Smiling young fans in the stands is one of our favourite sights 👦👧#BBL10 pic.twitter.com/IUEVOxmqYY
— ICC (@ICC) December 23, 2020
२० षटकांच्या बिग बॅश लीग १०मध्ये २३ डिसेंबरपर्यंत १३ सामने झाले आहेत. ऍडलेड स्ट्राईकर्स आणि ब्रिसबेन हिट संघात झालेल्या तेराव्या सामन्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. ऍडलेड स्ट्राईकर्सने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात ब्रिसबेन हिट मर्यादित २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर १४८ धावाच करू शकला. अशाप्रकारे ऍडलेड स्ट्राईकर्सने २ धावांनी सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ : राशिद खानच्या केवळ ४ चेंडूवर ‘या’ गोलंदाजाने फटकाविल्या तब्बल १५ धावा
‘भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम’, माजी दिग्गजाची टीका
‘लाल चेंडूने भारताला होईल फायदा’, माजी खेळाडूचे वक्तव्य