---Advertisement---

पुन्हा बदलले गेले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे ठिकाण! लॉर्ड्स नव्हेतर या मैदानावर होणार सामना

On: बुधवार, सप्टेंबर 21, 2022 4:12 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची दुसरी सायकल मध्यात आली आहे. 2021 ते 2023 अशा काळात ही स्पर्धा दुसऱ्यांदा आयोजित केली गेलीये. आता या दुसऱ्या सायकलच्या अंतिम फेरीबाबत एक महत्त्वाचे अपडेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) देण्यात आले आहे. आयसीसीने पुन्हा एकदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतलाय.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. जगातील नऊ देश या स्पर्धेत सहभागी होतात. पहिल्या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला गेलेला. यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवत या स्पर्धेचे पहिले विजेते होण्याचा मान मिळवला होता. त्यावेळी हा अंतिम सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर होण्याचे निश्चित झालेले. मात्र, त्यावेळी जगभरात कोविडचे सावट असल्याने अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे खेळवावा लागलेला.

 

आता होत असलेल्या दुसऱ्या आणि त्यानंतर होणाऱ्या 2023 ते 2025 या स्पर्धेच्या तिसऱ्या सायकलचे अंतिम सामने लॉर्ड्स येथे खेळवण्याचे निश्चित केले होते. मात्र, बुधवारी (21 सप्टेंबर) आयसीसीने एक पत्रक जाहीर करत, सध्या सुरू असलेल्या सायकलचा अंतिम सामना लंडन येथेच मात्र लॉर्ड्सऐवजी ओव्हल मैदानावर खेळला जाणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबत आयसीसीने तितक्या स्पष्टपणे कोणतेही कारण दिले नाही. मात्र, पुढील सायकलवेळी अंतिम सामना पुन्हा एकदा लॉर्ड्सवर घेण्यात येईल असे देखील नमूद केले.

ही दोन्ही मैदाने इंग्लंडची राजधानी लंडन येथे स्थित आहेत. ओव्हल मैदानावर यापूर्वी 2004 व 2017 पुरुष चॅम्पियन ट्रॉफीचे अंतिम सामने खेळले गेले आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2021-2023 या सायकलमध्ये सध्यातरी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ अंतिम फेरीचे प्रबळ दावेदार मानले जातायेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकेवेळी अतिशय मोठी शारिरीक समस्या असलेला गेल पुढे झाला ‘युनिवर्सल बॉस’
‘एवढ्या धावा केल्या, तरीही…’, कर्णधार रोहितने ‘यांच्या’ डोक्यावर फोडले पराभवाचे खापर
अस काय घडलं की भर मैदानात रोहितने पकडला कार्तिकचा गळा? पाहा व्हिडिओ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---