---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सूर्याची रँकिंगमध्ये मोठी झेप! नंबर-1 वर असूनही अभिषेक शर्माला फटका

On: बुधवार, जानेवारी 28, 2026 5:57 PM
---Advertisement---

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आयसीसीने ताजी टी-20 रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने रँकिंगमध्ये 5 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. तो आता 12 व्या क्रमांकावरून थेट 7 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याची सध्याची रेटिंग 717 झाली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सूर्या जबरदस्त फॉर्मात असून त्याने दुसऱ्या सामन्यात 82* आणि तिसऱ्या सामन्यात 57* धावांची तुफानी खेळी केली होती. युवा सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) अजूनही जगातील नंबर 1 टी-20 फलंदाज आहे. मात्र, त्याच्या रेटिंगमध्ये किंचित घट झाली आहे. त्याची रेटिंग 931 वरून 929 वर आली आहे. त्यामुळे अव्वल स्थानी असूनही तांत्रिकदृष्ट्या त्याचे थोडे नुकसान झाले आहे.

टॉप-5 फलंदाजांची यादी

अभिषेक शर्मा भारत 929
फिल सॉल्ट इंग्लंड 849
तिलक वर्मा भारत 781
जोस बटलर इंग्लंड 770
साहिबजादा फरहान पाकिस्तान 763

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---