---Advertisement---

आयर्लंडनं पाकिस्तानसमोर ठेवलं अवघ्या 107 धावांचं आव्हान!

On: रविवार, जून 16, 2024 9:48 PM
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 36वा सामना पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड (16 जून) रोजी लॉडरहिल, फ्लोरिडा, सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड येथे खेळला जात आहे. पाकिस्तान आणि आयर्लंड संघ सुपर 8च्या क्वालिफाय रेसमधून बाहेर पडले आहेत. परंतु दोन्ही संघ सन्मानासाठी आज दोन्ही संंघ भिडत आहेत. आयर्लंडनं अवघ्या 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

तत्पूर्वी पाकिस्ताननं टाॅस जिंकून आयर्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केलं होत. प्रत्युत्तरात आयर्लंडनं पाकिस्तानसमोर 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आयर्लंडसाठी गॅरेथ डेलेनी सर्वाधिक 19 चेंडूत 31 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 3 उत्तुंग षटकार लगावले. मार्क एडेअर 15 तर जॉर्ज डॉकरेलनं 11 धावांची खेळी खेळली आणि यांच्या जोरावर आयर्लंडनं 9 गडी गमावून निर्धारित 20 षटकात 106 धावसंख्या गाठली

पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी आणि इमाद वसीमनं 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद अमिर 2 विकेट्स घेण्यात यशस्वी राहिला तर हारिस रौफनं 1 विकेट्स मिळवली.

यंदाच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान आणि आयर्लंड संघ ग्रुप-अ मध्ये समाविष्ट आहेत. ग्रुप-अ मधून भारतीय संघानं 6 गुणांसहित सुपर 8 साठी क्वालिफाय केलं आहे आणि गुणतालिकेत ते शीर्ष स्थानी आहेत. ग्रुप-अ मधून सुपर 8 साठी क्वालिफाय करणारा अमेरिका दुसरा संघ ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि आयर्लंड संघाला हा सामना जिंकून काहीही फायदा होणार नाही.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

पाकिस्तान- मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सॅम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद अमीर, अब्बास आफ्रिदी

आयर्लंड- पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट

महत्त्वाच्या बातम्या-

यू मुम्बाने प्रतिभावंत खेळाडू मानव ठक्करला केले रिटेन
पाकिस्ताननं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
“वादळ येण्यापूर्वीची शांतता…” कोहलीच्या फाॅर्मबद्दल ‘या’ दिग्गज खेळाडूनं दिली भन्नाट प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---