यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) अफगाणिस्ताननं चमकदार कामगिरी केली. या विश्वचषकात अफगाणिस्ताननं अद्याप एकही सामना गमावला नाही. सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान संघानं ग्रुप-क मधून क्वालिफाय केलं आहे. ग्रुप-क मधील दोन संघ सुपर 8 साठी पात्र ठरले. त्यामध्ये अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजचा सामावेश आहे. तत्पूर्वी अफगाणिस्ताचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट खूप आनंदी झाले आहेत. ते म्हणाले की, अफगाणिस्ताननं अजून त्यांचं सर्वोत्तम देणं अजून बाकी आहे.
इंग्लंडचे माजी खेळाडू जोनाथन ट्राॅट (Jonathan Trott) हे सध्या अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ते म्हणाले, “आमचा अजून एक सामना बाकी आहे. हा सामना आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. वेस्ट इंडिज हा खूप मजबूत संघ आहे. त्यांनी न्यूझीलंड संघाचा पराभव केला. त्यांच्याविरुद्ध आम्हाला शेवटचा सामना खेळायचा आहे. त्या सामन्यात आम्ही आमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करु. यंदाच्या टी20 विश्वचषकात आम्ही 3 सामने जिंकले याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु वास्तविक हे मान्य करावं लागेल की, आम्ही काहीच जिंकलं नाही.”
यंदाच्या टी20 विश्वचषकात अफगाणिस्तान संघाची धुरा फिरकीपटू राशिद खानकडे आहे. राशिद खानच्या कर्णधारपदात अफगाणिस्तान संघानं उत्कष्ट कामगिरी केली आहे.अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीनं गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही. त्यानं आतापर्यत 12 विकेट्स घेतल्या आहेत. तर अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झादरान यांनी दमदार फलंदाजी केली आहे. यादरम्यान पहिल्या सुपर 8 सामन्यासाठी अफगाणिस्तानपुढं (20 जून) रोजी भारतीय संघाचं आव्हान असणार आहे.
जोनाथन ट्राॅट (Jonathan Trott) पुढं बोलताना म्हणाले, “आमचा संघ खूप प्रतिभाशाली आहे. आम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. आम्ही कोणत्याही संघाशी सामना करु शकतो. परंतु मला अजून वाटत आहे की, आम्ही अजून सर्वश्रेष्ठ खेळ दाखवला नाही. आम्ही अजून काही गोष्टींमध्ये सुधारणा करत आहोत. जेणेकरुन आम्ही महत्वाच्या संघांचा पराभव करु शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
फ्लोरिडामध्ये पूरसदृश परिस्थिती, भारत-कॅनडा सामन्यावर पावसाचे सावट!
अफगाणिस्तानसह ‘हे’ संघ सुपर-8 साठी पात्र, न्यूझीलंड-श्रीलंका विश्वचषकातून आउट!
टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे, विराटच्या नावी लज्जास्पद विक्रमाची नोंद!