---Advertisement---

“फायनलमध्ये धोनीनं जे केलं होतं, तेच कोहली करणार”, माजी क्रिकेपटूचा मोठा दावा

On: शनिवार, जून 29, 2024 3:18 PM
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) फायनल सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs RSA) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीनं या टी20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी केली आहे परंतू भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफला वाटतं आहे, की विराट कोहली फायनलमध्ये चमकदार कामगिरी करेल.

मोहम्मद कैफनं (Mohammad Kaif) सोशल मीडिया ‘एक्स’ या प्लॅटफाॅर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं म्हटलं आहे की, “विराट कोहलीनं हे लक्षात ठेवायला हवं की 2011चा एकदिवसीय विश्वचषक महेंद्रसिंग धोनीसाठीही फारसा चांगला गेला नाही परंतू त्यानं फायनल सामन्यात फॉर्म मिळवला. एक छोटासा सल्ला: कोहली इतका चांगला खेळाडू आहे की त्यानं स्लोगिंग करू नये. तो चेंडू त्याच्या क्षमतेनुसार खेळू शकतो आणि तो कोणत्याही गोलंदाजीवर वर्चस्व गाजवू शकतो.”

 

पुढे बोलताना मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) म्हणाला, “2011च्या एकदिवसीय विश्वचषकात महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) फॉर्ममध्ये नव्हता. त्यानं फायनल सामन्यात 91 धावांची नाबाद खेळी खेळली. धोनीनं कुलसेकराला लाँग ऑनवर मारलेला षटकार सर्वांच्या मनात आजही घर करुन आहे. त्यामुळे विराट कोहलीलाही फायनलमध्ये हिरो बनण्याची मोठी संधी आहे, असं मला वाटतं.”

विराट कोहलीनं (Virat Kohli) यंदाच्या टी20 विश्वचषकात 7 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 75 धावा केल्या आहेत. यादरम्यान तो दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे. आज (29 जून) रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत फायनल सामना खेळणार आहे. या सान्यात भारताला विराट कोहलीकडून योगदानाची अपेक्षा असेल.

महत्त्वाच्या बातम्या

कुठे पूजा…तर कुठे होम हवन! टीम इंडियाच्या विजयासाठी चाहत्यांचे देव पाण्यात
टी20 विश्वचषक विजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव, उपविजेता संघही होणार मालामाल! बक्षिसाची रक्कम जाणून घ्या
शिवम दुबेचा पत्ता कट? टीम इंडिया बदलणार सलामी जोडी, पाहा फायनलमध्ये भारताची संभाव्य प्लेइंग 11–

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---